अतिवृष्टीमुळे शेतीपिकांच्या झालेल्या नुकसानीच्या मदतीसाठी ३०७ कोटी २५ लाखांपेक्षा निधी वितरणास मान्यता

Spread the love

MUMBAI : राज्यात नोव्हेंबर, २०२३ ते जुलै, २०२४ या कालावधीत राज्यातील विविध जिल्ह्यात अवेळी पावसामुळे, अतिवृष्टीमुळे शेतीपिकांच्या झालेल्या नुकसानापोटी बाधित शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी  राज्य शासनाने तीनशे सात कोटी पंचवीस लक्ष एकोणतीस हजाराच्या मदतीचा निधी वितरीत करण्यास  मंजूरी दिली आहे.

या निर्णयामुळे बाधित शेतकऱ्यांना मदत व दिलासा मिळणार असून याबाबतचा शासन निर्णय आज ५ सप्टेंबर २०२४ रोजी जारी करण्यात आला आहे, अशी माहिती मदत, पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी दिली.

BADALAPUR CRUELTY बदलापूरमधील जनक्षोभानंतरच पोलिसांनी कारवाई केली, उच्च न्यायालयाचे ताशेरे

मदत, पुनर्वसन मंत्री पाटील यांनी सांगितले,  २२.६.२०२३ च्या शासन निर्णयान्वये सततचा पाऊस ही नैसर्गिक आपत्ती घोषित करण्यात आली आहे. त्यानुसार नोव्हेंबर, २०२३ मधील अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या व त्यापुढील कालावधीसाठी अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेतीपिकांच्या नुकसानीकरिता सुधारित दराने २ ऐवजी ३ हेक्टरपर्यंत मदत अनुज्ञेय करण्यात आली आहे. 

TAPORI TURAKI नितीन लाडानं बायको नीलिमाला म्हणाला …

यापूर्वी १० जानेवारी २०२४ व ३१ जानेवारी २०२४ च्या शासन निर्णयानुसार अनुक्रमे १४४.१० कोटी व २१ हजार ०९.१२ कोटी इतका निधी नोव्हेंबर व डिसेंबर २०२३ या कालावधीत अवेळी पावसामुळे झालेल्या शेतीपीक नुकसानीकरिता मदत मंजूर करण्यात आलेली आहे. तसेच, २ ऑगस्ट २०२४ रोजीच्या शासन निर्णयान्वये जानेवारी २०२४ ते मे २०२४ या कालावधीत राज्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीपोटी ५९६.२१ कोटी इतकी मदत मंजूर करण्यात आलेली आहे.

lokbimb online team

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : १ कोटी ५९ लाख भगिनींना ४७८७ कोटींचे वाटप

Thu Sep 5 , 2024
Spread the loveLADAKI BAHIN YOJANA : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आजपर्यंत जुलै आणि ऑगस्ट अशा दोन टप्प्यात १ कोटी ५९ लाख भगिनींना ४७८७ कोटींचा लाभ देण्यात आला आहे, अशी माहिती राज्य मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आली. जुलै आणि ऑगस्ट अशी एकत्रित ३ हजार रुपयांची रक्कम डीबीटी द्वारे थेट खात्यात जमा […]

You May Like

Chief Editor

Johny Watshon

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua. Ut enim ad minim veniam, quis nostrud exercitation ullamco laboris nisi ut aliquip ex ea commodo consequat. Duis aute irure dolor in reprehenderit in voluptate velit esse cillum dolore eu fugiat nulla pariatur

Quick Links