यंदाची निवडणूक उन्हाच्या तडाख्यात होरपळणार ?

Spread the love

वाढत्या तापमानापासून पृथ्वीचा कोणताही कोपरा सुरक्षित नाही


INCREASE TEPARATURE : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीतील पहिला उद्यापासून सुरू होत असतानाच उन्हाचा पारा सुद्धा चांगलाच वाढत आहे़ त्यामुळे ही निवडणूक उन्हाच्या तडाख्यात होरपळणार की काय, अशी शंका निर्माण झाली आहे़

बुधवारी 43.8 अंश इतक्या देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद राजस्थानातील राजकोट येथे करण्यात आली. भारतीय हवामान शास्त्र विभागानुसार (आयएमडी), देशाच्या बहुतांश राज्यांमध्ये तापमान 2 ते 3 अंशांनी वाढताना दिसत असून, पुढील पाच दिवस उष्णतेची लाट येण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. प़ बंगाल, ओडिशा, झारखंड, गुजरात, मध्य प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडूसह इतरही काही राज्यांतील तापमानात मोठी वाढ अपेक्षित आह़े़ त्याचा विपरीत परिणाम दैनंदिन कामांवर होऊ शकतो.

2024 हे हवामान रेकॉर्डवरील सर्वात उष्ण वर्ष असण्याची 55 टक्के शक्यता आहे. 2024 हे पाच सर्वात उष्ण वर्षांमध्ये समाविष्ट होण्याची 99 टक्के शक्यता आहे. नॅशनल ओशनिक अँड अटमॉस्फेरिक अडमिनिस्ट्रेशनच्या नॅशनल सेंटर फॉर एन्व्हायनर्मेंटल इन्फॉर्मेशकडून जारी केलेल्या नवीन अहवालात ही माहिती समोर आली आहे. कोपर्निकस क्लायमेट चेंज सर्व्हिसनंतर आता एनएसओएने सुद्धा ही पुष्टी केली आहे, की मार्च 2024 हा आतापर्यंतच्या हवामान इतिहासातील सर्वात उष्ण मार्च होता. मार्च 2024 मधील सरासरी तापमान 20 व्या शतकातील मार्चच्या सरासरी तापमानापेक्षा 1.35 अंश सेल्सिअस जास्त नोंदवण्यात आले. आकडेवारीनुसार, हा ४८ वा मार्च आहे जेव्हा विसाव्या शतकातील सरासरी तापमानापेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली आहे.

सर्वात उष्ण मार्चचा या आधीचा विक्रम मार्च 2016 मध्ये नोंदवला गेला होता़ त्यावेळी तापमान विसाव्या शतकाच्या सरासरीपेक्षा 1.34 अंश सेल्सिअसने जास्त नोंदवले होते. त्याचप्रमाणे, मार्च 2023 मध्ये विसाव्या शतकातील सरासरी तापमानापेक्षा 1.23 अंश सेल्सिअसने सरासरी तापमानाची नोंद झाली होती.

पृथ्वीच्या पृष्ठभागाचे तापमान पाहिल्यास हा चौथा सर्वांत उष्ण मार्च आहे. यात तापमान सामान्यपेक्षा 2.09 अंश सेल्सिअसने जास्त नोंदवण्यात आले़ एवढेच नाही तर जून २०२३ नंतर हा सलग दहावा महिना आहे, ज्यात जागतिक स्तरावर वाढत्या तापमानाने नवा विक्रम केला आहे. याचा अर्थ जून 2023 पासून असा एकही महिना गेला नाही की जेव्हा वाढत्या तापमानाने नवीन विक्रम केला नसेल.

धक्कादायक म्हणजे मार्च 2024 मध्ये आफ्रिका, युरोप आणि दक्षिण अमेरिका, तसेच पूर्व उत्तर अमेरिका, पूर्व आशिया आणि पूर्व आॅस्ट्रेलियामध्ये तापमान सरासरीपेक्षा जास्त असल्याचेही अहवालात उघड झाले आहे़ ‘डाऊन टू अर्थ’ या आंतरराष्ट्रीय हवामानविषय संकेतस्थळाने यासंदर्भात वृत्त दिले आहे़

Lokbimb

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

LOKBIMB OFFBEAT : मतदान जागृतीचा असाही प्रयत्न …

Fri Apr 19 , 2024
Spread the love # VOTING AWARNESS # LOKSABHA ELECTION

You May Like

Chief Editor

Johny Watshon

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua. Ut enim ad minim veniam, quis nostrud exercitation ullamco laboris nisi ut aliquip ex ea commodo consequat. Duis aute irure dolor in reprehenderit in voluptate velit esse cillum dolore eu fugiat nulla pariatur

Quick Links