विशेष असे, की यात तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवले जाते. सी व्हिजिल ‘अॅप’ अँड्रॉईड आणि आयओएस डिव्हाईसवर डाऊनलोडसाठी उपलब्ध आहे. उल्लंघनाची तक्रार करण्यासाठी वापरकर्त्यांनी फक्त ‘अॅप’ उघडणे, उल्लंघनाचा प्रकार निवडणे आणि घटनेची माहिती, स्थान, वेळ आणि छायाचित्रे किंवा व्हीडिओ अपलोड करणे गरजेचे आहे.
MAHARASHTRA VIDHANSABHA ELECTION 2024 l October 27, 2024
विधानसभा निवडणूक २०२४ च्या आचारसंहिता कालावधीत आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्यास सर्वसामान्य मतदार, नागरिकांना आता थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार करता येणार आहे.
भारत निवडणूक आयोगाने ‘सी व्हिजिल सिटीझन अॅप’ [ C VIGIL CITIGEN APP ] विकसित केले आहे. यावर दाखल होणाºया तक्रारींवर फक्त 100 मिनिटांत पहिली कार्यवाही केली जात आहे.
आचारसंहिता कालावधीत काय करावे आणि काय टाळावे, या संदर्भात निवडणूक उमेदवार, प्रशासन आणि राजकीय पक्षांना माहिती देण्यात येते. काहीवेळा आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होते. त्याची तक्रार करणे अधिक सोपे झाले आहे.
TAPORI TURAKI डार्लिंग, तुम दिन से दिन खुबसूरत होती जा रही हो
आचारसंहिता उल्लंघनाची तक्रार किंवा माहिती निवडणूक आयोग आणि जिल्हा प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने सदर अॅप विकसित केले आहे. याद्वारे मतदारांना आता थेट आयोगाकडे तक्रार करता येणार आहे. ‘अॅप’वर तक्रार प्राप्त होताच निवडणूक विभागाकडून कारवाई केली जाते.