RAILWAY RESERVATION l November 1, 2024
रेल्वे तिकीट आरक्षणाचे नवीन नियम आजपासून लागू झाले आहेत. रेल्वेने याआधी असलेल्या १२० दिवसांच्या आरक्षण कालावधीत कपात करून तो ६० दिवसांवर आणला आहे. मात्र, ३१ आॅक्टोबरपर्यंत झालेली आरक्षणे कायम राहतील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
६० दिवसांच्या आरक्षण कालावधीमुळे तिकिटांच्या उपलब्धतेच्या शक्यता वाढून त्याचा प्रवाशांना थेट लाभ मिळेल. ६१ दिवस ते १२० दिवसांच्या कालावधीसाठी केलेली तिकीट आरक्षणे प्रवाशांकडून रद्द करण्याचे प्रमाण २१ टक्के इतके होते, अशी माहिती रेल्वेकडून देण्यात आली़