पंढरीचे विठ्ठल PANDHARPUR VITHHAL महाराष्ट्राचे आराध्य दैवत… या दैवतावर मराठी कवींनी अनेक गीते,भक्तिगीते,चित्रपटगीते आणि नाट्यगीते लिहिली आहेत. राम मराठे,भीमसेन जोशी, जितेंद्र अभिषेकी, किशोरी आमोणकर, प्रकाश घांग्रेकर, मन्ना डे, लता मंगेशकर LATA MANGESHKAR, वसंत आजगावकर, सुधीर फडके,वसंतराव देशपांडे, अनुराधा पौडवाल, विठ्ठल शिंदे,रामदास कामत यासारख्या गायकांनी गायन केले आहे.
अगा वैकुंठीचा राया (नाटक: संत कान्होपात्रा),अणुरेणुया थोकडा (कवी : संत तुकाराम, संगीत: राम फाटक),अबीर गुलाल उधळीत रंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग (संगीत:राम फाटक),अवघा रंग एक झाला,अवघे गरजे पंढरपूर, चालला नामाचा गजर (कवी: अशोकजी परांजपे,नाटक:गोरा कुंभार),आधी रचली पंढरी (कवी :संत नामदेव),आता कोठे धावे मन (संगीत:राम फाटक),आनंदाचे डोही आनंद तरंग,आरंभी वंदीन अयोध्येचा राजा,आली कुठूनशी कानी, टाळ मृदुंगाची धून, नाद विठ्ठल विठ्ठल (कवी:सोपानदेव चौधरी), इंद्रायणी काठी, देवाची आळंदी, लागली समाधी ज्ञानेशाची (कवी: ग. दि. माडगूळकर,संगीत: पु.ल. देशपांडे, चित्रपट: गुळाचा गणपती, राग-भीमपलास),एकतारी संगे एकरूप झाला,कानडा हो विठ्ठ्लू करनाटकू तेणे मज लावियला वेधू,कानडा राजा पंढरिचा, वेदांनाही नाही कळला अंतपार याचा (चित्रपट:झाला महार पंढरीनाथ),काया ही पंढरी, आत्मा पांडुरंग (संगीत:राम फाटक), कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर (नाटक: गोरा कुंभार), खेळ मांडियेला वाळवंटी ठायी,चंद्रभागेच्या तीरी, उभा मंंिदरी (कवी: दत्ता पाटील), चल गं सखे चल गं सखे पंढरिला,चला पंढरीसी जाऊ,जन वजन झाले आम्हा,पाउले चालती पंढरीची वाट (कवी:दत्ता पाटील, संगीत:मधुकर पाठक),पांडुरंग कांती दिव्य तेज झळकत…कानडा हो विठ्ठलू करनाटकू (कवी:संत ज्ञानेश्वर, गायिका :आशा भोसले, संगीत: हृदयनाथ मंगेशकर),पांडुरंग त्राता पांडुरंग दाता,पावलों पंढरी वैकुंठभुवन, फिरत्या चाकावरती देसी मातीला आकार, विठ्ठला तू वेडा कुंभार (कवी: ग. दि. माडगूळकर, चित्रपट: प्रपंच), बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल,सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, ज्ञानियांचा राजा (संगीत – राम फाटक)