इकडे लक्ष हवे : ‘ओबीसीं’ना स्वयंरोजगाराची सुवर्णसंधी

Spread the love
file photo

महाराष्ट्र राज्यातील ओबीसी प्रवर्गातील लोकांना स्वयंरोजगाराला चालना देण्यासाठी तसेच उच्च शिक्षणाकरिता शासनाने बहुजन कल्याण विभागांतर्गत महाराष्ट्र इतर मागासवर्गीय  वित्त आणि विकास महामंडळाची स्थापना केली आहे. या महामंडळामार्फत कृषी संलग्न व्यवसाय वृद्धीसाठी अत्यंत अल्प व्याजदराने तसेच बिनव्याजी दराने कर्ज वितरीत करण्यात येते. महामंडळाच्या काही योजनांची माहिती या लेखाच्या माध्यमातून करून देण्याचा प्रयत्न…

20 टक्के बीज भांडवल योजना

·         ही योजना राज्यातील राष्ट्रीयकृत बँकेमार्फत राबविली जाते.

·         यामध्ये महामंडळाचा सहभाग 20 टक्के, लाभार्थ्याचा सहभाग 5 टक्के व बँकेचा सहभाग

            75 टक्के

·         या योजनेमध्ये महत्तम प्रकल्प मर्यादा रु. 5 लक्ष आहे.

·         अर्जदाराचे वय 18 ते 50 वर्ष असावे.

थेट कर्ज योजना

·         ही योजना महामंडळामार्फत राबविली जाते.

·         यामध्ये महत्तम कर्ज मर्यादा 1 लक्ष रुपये असून परतफेडीचा कालावधी 4 वर्ष आहे.

·         या योजनेत शेतीला पूरक किंवा इतर छोट्या व्यवसायाकरिता कर्ज दिले जाते.

·         परतफेडीचा कालावधी 5 वर्षे असून नियमित परतफेड केल्यास व्याज आकारले जात नाही,

            परंतु थकीत झालेल्या हप्त्यांवर वार्षिक 4 टक्के व्याज दर आकारण्यात येते.

·         कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लक्ष पर्यंत असावे.

·         अर्जदाराचे वय 18 ते 55 वर्ष असावे.

वैयक्तिक कर्ज व्याज परतावे योजना

·         गरजू व कुशल व्यक्तींना नवीन व्यवसाय सुरु करण्यासाठी तसेच व्यायसाय वृद्धीकारिता हि

            योजना राज्यातील राष्ट्रीयकृत बँकेमार्फत तसेच सहकारी बँकेमार्फत राबविली जाते.

·         व्यवसायाकरिता मागणीनुसार 1 ते 10 लक्ष रुपयापर्यंत बँकेमार्फत देण्यात येते.

·         बँकेचे कर्ज नियमित परतफेड केल्यास महामंडळामार्फत 12 टक्के पर्यंत व्याज परतावा

            रक्कम अनुदान स्वरुपात लाभार्थीला देण्यात येते.

·         लाभार्थीने कर्जासाठी ओनलाइन महामंडळाच्या संकेतस्थळावर अर्ज करावा.

·         कुटुंबाचे वार्षिक वय उत्पन्न 8 लक्ष पर्यंत असावे.

·         अर्जदाराचे वय 18 ते 50 वर्ष असावे.

शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना

·         उच्च शिक्षणाकरिता देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय अभ्याक्रमासाठी प्रवेश घेण्याकरिता 10

            ते 20 लक्ष रुपये इतके महत्तम कर्ज बँकेमार्फत दिले जाते.

·         बँकेचे कर्ज नियमित परतफेड केल्यास महामंडळामार्फत 12 टक्केपर्यंत व्याज परतावा

            रक्कम अनुदान स्वरुपात लाभार्थीला देण्यात येते.

या कर्जासाठी आर्हता खालीलप्रमाणे असावी.

§          अर्जदार इयत्ता बारावी मध्ये 60 टक्के व अधिक गुणांनी उत्तीर्ण असावा.

§          अर्जदाराचे वय 17 ते 30 असावे.

§          कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लक्ष पर्यंत असावे.

महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना

·           इतर मागासवर्गीय प्रवर्गातील गरीब व होतकरू महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी

            राज्यातील बचत गटातील उत्पादित केलेल्या वस्तूंचे उत्पादन प्रक्रिया व मूल्य आधारित

            उद्योगांकरिता बँकेमार्फत मंजूर करण्यात आलेल्या 5 ते 10 लक्ष रुपयापर्यंतच्या कर्ज

            रक्क्मेवरील 12 टक्के व्याज परतावा उपलब्ध करून देण्यात येते.

·           सदर योजना महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत लोकसंचालित साधन केंद्राच्या

            सहाय्याने राबविण्यात येते.

·           या योजनेचा लाभ घेणारी महिला इतर मागास प्रवर्गातील व महाराष्ट्राची रहिवाशी असावी,

            त्यांचे वय 18 ते 60 वर्ष असावे.

·           बचत गटाची नोंदणी महिला विकास महामंडळाच्या लोकसंचालित साधन केंद्रात केलेली

            असावी.

उपरोक्त योजनांचा लाभ घेण्याकरिता इच्छुकांनी महाराष्ट राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ नागपूर यांचे कार्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन राहते कॉलनी बी विंग ३०३, फोन नं.०७१२-२९५६०८६, ७७५८८६६६९६ तसेच संकेतस्थळ www.msobcfdc.in येथे संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक सुशांत के. बेझलवार यांनी केले आहे. 

[ सौजन्य महासंवाद ]

lokbimb online team

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

१ लाख कोटींच्या योजनांचा समावेश असलेला क्रांतिकारी अर्थसंकल्प

Fri Jun 28 , 2024
Spread the loveएकूणच दुर्बल घटकाचे दारिद्रय नाहीसे करण्यासाठी केलेला निश्चय यामुळे हा अर्थसंकल्प वैशिष्ट्यपूर्ण ठरला आहे. महाराष्ट्राच्या  विकासाचा गजर करणारा अर्थसंकल्प असल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. राज्याचा अर्थसंकल्प खऱ्या अर्थाने महिला, युवक, शेतकरी यांचा सन्मान करून त्यांना मोठे बळ देणारा आहे. १ लाख कोटींच्या योजनांचा समावेश असलेला हा क्रांतिकारी अर्थसंकल्प दुर्बल, […]

You May Like

Chief Editor

Johny Watshon

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua. Ut enim ad minim veniam, quis nostrud exercitation ullamco laboris nisi ut aliquip ex ea commodo consequat. Duis aute irure dolor in reprehenderit in voluptate velit esse cillum dolore eu fugiat nulla pariatur

Quick Links