NAGPUR : उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख [ FORMER HOME MINISTER ANIL DESHMUKH ] आज एकाच व्यासपीठावर स्थानापन्न होते़. देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्रामीण भागातील झिल्पा, भोरगड व घाट पेंढरी येथील नवनिर्मित प्राथमिक आरोग्य केद्रांचा लोकार्पण सोहळा पार पडला, त्यावेळी हा योग जुळून आला.
ग्रामीण भागातील नागरिकांना प्राथमिक उपचारांसाठी शहरी भागातलांब पल्ल्याच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये यावे लागत असे. आता मात्र त्यांचा हा त्रास वाचणार असून, त्यांच्या गावातच योग्य पद्धतीने उपचार मिळणे शक्य होणार आहे, असे मत उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रतिपादित केले.
TAPORI TURAKI तुम्ही खुश अन् मीही खुश…
मोबाईल वाटप
कार्यक्रमात जिल्ह्यातील सुमारे १ हजार ९०० हुन अधिक आशा सेविकांना मोबाईल वाटप करण्यात आले. आशा सेविकांच्या कामामध्ये सुकरता यावी यासाठी त्यांना खनिज विकास निधीमधून मोबाईल्सचे वितरण करण्यात आले आहे. आशा सेविका सरकारच्या योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्याचे काम अगदी चोख पद्धतीने बजावत असतात. सर्व सामान्य जनतेशी त्यांचा रोज संबंध येत असतो. त्यांचे दैनंदिन काम अधिक सुकर करण्यासाठी हे मोबाईल वितरित केले आहे. या मोबाईलच्या रिचार्जचा खर्च देखील सरकार उचलणार असून यासाठी लवकरच निधी देण्यात येईल, अशी माहिती
त्यांनी दिली.
आपल्या सरकारने आशा सेविकांच्या मानधनात वाढ, त्यांचा १० लाखांचा विमा असे अनेक कल्याणकारी निर्णय घेतले आहे़ यशिवाय अनेक कल्याणकारी योजना सुद्धा लागू केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
TAPORI TURAKI बंड्यानं त्याच्या घरात डोकं सरकवलं …
कार्यक्रमाला खासदार डॉ. श्यामकुमार बर्वे, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आमदार प्रवीण दटके, आमदार सुधाकर आडबैले, आमदार आशिष जयस्वाल,आमदार टेकचंद सावरकर, नागपूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष मुक्ता कोकड्डे, उपाध्यक्ष कुंदा राऊत, जिल्हा परिषदेच्या विविध विभागाचे अधिकारी यांच्यासह मान्यवर मंडळी उपस्थित होती.