नागपूर : ग्रामीण भागातील अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील लोकांचे राहणीमान उंचावे, त्यांचे उत्पन्नस्त्रोत वाढावे तसेच ग्रामीण भागातील आर्थिकदृष्टया कमकुवत, बेघर लोकांना हक्काचे घर मिळावे याकरीता महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाद्वारा रमाई आवास घरकुल योजना [ RAMAI AAWAS YOJANA MAHARASHTRA ] राबविण्यात येते.
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस [ DCM FADANVEES ] यांच्या कुशल नेतृत्वाखाली जिल्ह्यातील तब्बल 5 हजार 782 कुटुंबांना या योजने अंतर्गत हक्काचा निवारा अर्थात रमाई घरकुल आता मिळाले आहेत. पात्र गरजूंना स्वत:चे हक्काचे घरकुल मिळावे याकरीता शासनाद्वारा रमाई आवास घरकुल योजना (ग्रामीण) राबविली जाते. या योजनेंतर्गत ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना त्यांच्या स्वत:च्या जागेवर अथवा कच्च्या घराच्या ठिकाणी 300 चौरस फुट जागेवर घर बांधण्याकरीता अनुदान दिले जाते.
नागपूर जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौध्द घकातील जास्तीत जास्त गरीब कुटुंबांना त्यांचे घरकुलाचे स्वप्न साकार करता यावे यासाठी जिल्हास्तरीय समिती प्रयत्नशील आहे. आपण सर्वाधिक म्हणजेच 5 हजार 782 दलित कुटुंबाना घरकुल देऊ शकलो याचा अधिक आनंद आहे असे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या प्रतिक्रीयेत सांगितले. या योजना व्यतिरिक्त प्रधानमंत्री आवास योजना व इतर योजनांच्या दृष्टीने आम्ही अधिक प्रयत्नरत आहोत असे त्यांनी स्पष्ट केले.
TAPORI TURAKI आज भांडी मी घासतो, तू तोपर्यंत मोबाईल पाहा…
सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नागपूर कार्यालयाच्या वतीने पंचायत समितीकडुन परिपूर्ण दस्तावेज असलेले प्रस्ताव मागविण्यात आले. जिल्हयातील प्रत्येक पंचायत समितीनिहाय घरकुलाचे शिबिर लावण्यात आले होते. ग्रामिण क्षेत्रात प्रचंड प्रतिसाद याला मिळाला. प्राप्त झालेल्या प्रस्तावाची छाननी करून पात्र असलेले 5782 लाभार्थी प्रस्ताव जिल्हास्तरीय समितीसमोर मंजूरीकरीता सादर करण्यात आले.जिल्हास्तरीय समितीद्वारा पात्र असलेल्या लाभार्थी प्रस्तावास प्रशासकीय मंजूरी प्रदान करण्यात आली. आतापर्यंत मंजूरी करण्यात आलेल्या प्रस्तावांची तालुकानिहाय यादी व संख्या खालीलप्रमाणे आहे.
कळमेश्वर – 485, भिवापूर- 472, पारशिवनी- 635, कुही-677, हिंगणा- 146, नरखेड- 539, काटोल- 625, मौदा- 463, कामठी- 132, सावनेर- 439, रामटेक- 497, नागपूर ग्रामीण – 245, उमरेड- 427 असे एकूण 5 हजार 782 घरकुल दिली जात आहेत.
ज्या लाभार्थ्यांच्या प्रस्तावास जिल्हास्तरीय समितीद्वारा मंजूरी प्राप्त झालेली आहे अशा लाभार्थ्यांना घरकुल मंजूर झाल्याच्या सुचना पंचायत समितीद्वारा दिल्या जात आहेत. सदर योजनेंतर्गत ज्या लाभार्थ्यांनी अद्यापही अर्ज सादर केले नाहीत अशा लाभार्थ्यांना घरकुल मिळण्याकरीता संबंधित ग्रामपंचायतीमध्ये घरकुलाकरीता अर्ज सादर करता येतील.
LOKBIMB OFFBEAT मोबाईल फोन, दुचाकी जप्त
संबंधित पंचायत समितीने परिपूर्ण भरलेले व आवश्यक दस्तावेज असलेले (अर्जदाराचे जात प्रमाणपत्र, अर्जदाराचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र, टॅक्स पावती व नमुना-8 आदि आवश्यक दस्तावेज) अर्ज सादर करावेत, असे आवाहन सहाय्यक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे यांनी केले आहे.
या योजनेची अंमलबजावणी ही प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा परिषद नागपुर तसेच सामाजिक न्याय विभागाअंतर्गत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नागपुर यांचे कार्यालयामार्फत राबविली जाते. घराच्या बांधकामासाठी क्षेत्रनिहाय कमाल मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. यासाठी 1 लाख 20 हजार रुपयांचे अनुदान दिले जाते.
नव्या लोकसभेत ‘स्त्री राजशक्ती’ कमी : फक्त ७४ महिला खासदार, मंत्र्यांचा आकडा स्थिरावला ७ वर