किशोर कन्हेरे काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्त,माळी समाजाचा सन्मान

Spread the love

KISHOR KANHERE CONGRESS l November 3, 2024

file photo

माळी समाजाचे नेते किशोर कन्हेरे यांची काँग्रेस पक्षाकडून महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली़ संपूर्ण माळी समाजाचा हा सन्मान असल्याची भावना व्यक्त होत आहे़

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत माळी समाजाचे मोठ्या संख्येतील मतदान असल्याचे पाहता किशोर कन्हेरे यांची प्रदेश उपाध्यक्षपदी करण्यात आली़ एकट्या विदर्भात माळी समाजाचे जवळपास २२ लाख इतके मतदान असल्याचे मानले जाते़ किशोर कन्हेरे यांनी आपल्या नियुक्तीबद्दल सर्व नेत्यांचे आभार मानले आहेत.

येत्या विधानसभा निवडणुकीत माळी, तेली, कुणबी आदी समाजसंस्थांद्वारे महाविकास आघाडीला पूर्ण पाठिंबा देण्यात येणार असल्याचे जाहीर करून महाराष्ट्रभर प्रचार करण्यात येईल़ काँग्रेसच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीला सत्तेत आणण्यासाठी प्रयत्नांची परकाष्ठा करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला़


KISHOR KANHERE IN CONGRESS विदर्भाचे ‘बाहुबली’ किशोर कन्हेरेंचा काँग्रेस पक्षात प्रवेश

सुधाकर कोहळे म्हणतात, मी मागील दाराने नाहीच…आपण लोकांतून निवडून येण्यास इच्छुक

MOHAN MATE विद्यमान आमदार मोहन मतेंनी दाखल केला नामांकन अर्ज


माळी, तेली आणि कुणबी या समाजात किशोर कन्हेरे लोकप्रिय असल्यामुळे विदर्भातील समाजात त्यांच्या नियुक्तीने न्याय मिळाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, कन्हेरे यांच्या नियुक्तीचे राज्यभरातून स्वागत करण्यात येत आहे.

उल्लेखनिय असे, की मागील महिन्यात काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेश अध्यक्ष नाना पाटोले, माजी मंत्री आमदार सुनील केदार, माजी मंत्री नितीन राऊत, मुंबई अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड, खा. श्याम कुमार बर्वे, खा. सतेज पाटील आदींच्या प्रमुख उपस्थितीत किशोर कन्हेरे यांनी नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात प्रवेश केला होता़

lokbimb online team

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

उमेदवाराचे निवडणूक खर्चासाठी स्वतंत्र बँक खाते असावे

Sun Nov 3 , 2024
Spread the loveविधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ करिता भारत निवडणूक आयोग यांनी खर्चविषयक सूचना सारसंग्रह २०२४ मध्ये निर्देश दिल्यानुसार प्रत्येक उमेदवाराने आपल्या निवडणूक खर्चाकरिता स्वतंत्र बँक खाते [ SEPERATE BANK ACCOUNT ] उघडावे आणि त्यातूनच व्यवहार करावा, असे आदेश दिले आहेत़ उमेदवारांने निवडणूक खर्चासाठी असलेली संपूर्ण रक्कम संबंधित बँक खात्यामध्ये जमा […]

You May Like

Chief Editor

Johny Watshon

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua. Ut enim ad minim veniam, quis nostrud exercitation ullamco laboris nisi ut aliquip ex ea commodo consequat. Duis aute irure dolor in reprehenderit in voluptate velit esse cillum dolore eu fugiat nulla pariatur

Quick Links