मासेमार, मत्स्यकास्तकारांना मिळणार ‘किसान क्रेडिट कार्ड’ योजनेचा लाभ : डॉ. अतुल पाटणे

Spread the love

मुंबई : मच्छीमार, मत्स्यसंवर्धक, मत्स्यकास्तकार यांना किसान क्रेडिट कार्ड योजनेच्या माध्यमातून सन २०२४-२५ या वर्षांकरिता राज्यस्तरीय समितीने कर्जदर निश्चित केले आहेत. तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयुक्त मत्स्यव्यवसाय डॉ. अतुल पाटणे [ DR ATUL PATANE ] यांनी केले आहे.

शेततळे प्रति हेक्टर सर्वजाती मत्स्यपालन पाच लाख रूपये कर्ज दर निश्च‍ित करण्यात आला आहे. नदी, तलावामध्ये छोट्या नावेच्या सहाय्याने मासेमारी ८० हजार रूपये, निमखारे पाण्यातील सर्वजाती मत्स्यपालन प्रति हेक्टर तीन लाख रूपये, निमखारे पाण्यातील कोळंबी संवर्धन प्रतिहेक्टर तीन लाख रूपये निश्च‍ित करण्यात आलेला आहे.

TAPORI TURAKI : चला हसू या …धम्माल टपोरी टुरकीची … नालायक, तुम्हें चिड़िया कौन बनाएगा?

टॉलर मच्छीमार नौका तीन लाख रूपये, पर्सिसीन मच्छीमार नौका तीन लाख रूपये, गील नेटर मच्छीमार नौका तीन लाख रूपये, बिगर यांत्रिक मच्छीमार नौका ८० हजार रूपये, यांत्रिक मच्छीमार नौका एक लाख ५० हजार रूपये, शोभीवंत मत्स्यपालन एक लाख रूपये, गोड्या पाण्यातील मत्स्यव्यवसाय दोन लाख रूपये, पिंजरा पद्धतीने मत्स्यपालन ५० हजार रूपये अशा एकूण १४ घटकांना कर्जदर निश्च‍ित आहे.

PHOTO STUDIO : कोसळण्याच्या तयारीत

राज्यातील जास्तीत जास्त मच्छिमार, मत्स्यसंवर्धक, मत्स्यकास्तकार यांनी किसान क्रेडीट कार्ड योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्याचे सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.

lokbimb online team

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलली

Fri Aug 23 , 2024
Spread the loveMPSC : राज्य शासनाच्या सेवेतील विविध संवर्गातील पद भरतीकरीता २९ डिसेंबर २०२३ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीस अनुसरून विषयांकित महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ रविवार २५ ऑगस्ट, २०२४ रोजी घेण्याचे नियोजित होते. या संदर्भात आज [ २२ ऑगस्ट ] झालेल्या आयोगाच्या बैठकीमध्ये रविवार २५ ऑगस्ट, […]
EXAMINITION

You May Like

Chief Editor

Johny Watshon

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua. Ut enim ad minim veniam, quis nostrud exercitation ullamco laboris nisi ut aliquip ex ea commodo consequat. Duis aute irure dolor in reprehenderit in voluptate velit esse cillum dolore eu fugiat nulla pariatur

Quick Links