CHANDRASHEKHAR BAVANKULE : आगामी विधानसभा निवडणुकीत कोणी किती जागा लढवाव्यात याबद्दल महायुतीच्या घटक पक्षांमध्ये मतभेद नसून राज्यात महायुतीचे सरकार आणणे हेच आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे, असे मत भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्र्रशेखर बावनकुळे यांनी केले.
ते मुंबईत पत्रकारांसोबत बोलत होते.
CINERANG LOKBIMB : अभ्यासाची पुस्तके विकून अभिनय
याआधी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर त्याआधीच्या सरकारने सुरू केलेल्या १५ योजना बंद केल्या होत्या. आता पुन्हा त्यांचेच सरकार आल्यास ५० ते ६० योजना बंद करण्याचा त्यांचा विचार आहे, असा दावा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. राज्यातील १४ कोटी जनतेच्या कल्याणासाठी महायुतीचे सरकार आणणे गरजेचे असल्याचेही त्यांनी नमूद केले.
राज्यातील विरोधी पक्ष ‘शब्दच्छल’ करत आहे़ तर, दुसरीकडे ज्येष्ठ नेते तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दूरदृष्टीचे नेते आहेत, असेही बावनकुळे म्हणाले.