गोंदिया, विदर्भातील पूर्वेकडील एक जिल्हा़ भंडारा जिल्ह्यातून जन्मलेला़ तलावांचा, नद्यांचा प्रदेश, तसाच धान उत्पादकही !
सोबतच हिरव्यागार जंगलांचा…नागझिरा अभयारण्य [ Nagzira National Park ] भंडारा आणि गोंदियाच्या सीमेवर. अनेक वन्यप्राण्यांचे याठिकाणी वास्तव्य आहे. वैनगंगा, चुलबंद, वाघ अशा नद्या येथील वैभव आहे़ पर्यटकांसाठी बोदलकसा तलाव़ [ BODALKASA LAKE ] निसर्गाचं सौंदर्य ओसंडून वाहणारं रमणीय स्थान. ‘झाडीबोली’ [ GONDIA ZADIBOLI ] सुद्धा या मातीतील आगळं वैशिष्ट्य म्हणता येईल…
वनाचं महत्त्व शब्दातित आहे़ आजच्या घडीला वन-जंगलाचे रक्षण केले नाही, तर मानवजातच नष्ट होऊ शकते, इतपत भयाण स्थिती खुद्द मानवाने स्वत: तयार केली आहे.
तिरोडा तालुक्यातून सुकळी गाव ओलांडल्यानंतर बोदलकसा येथून कोटबर्रा, मंगेझरी मार्गे गोरेगांवच्या दिशेने आपल्याला पोहोचवणारा हा रस्ता़़़हिरवागार! रस्त्याच्या दोन्ही बाजूंना झाडांना बघताना आपले डोळे शांत होतात़ नवी चकाकी, नवी दृष्टी प्रदान करते़
दिवसा सुद्धा रातकिड्यांना ‘किर्र’ आवाज वातावरणातील गूढता वाढवत असतो़ तर, कधी एखादा पक्षी आपल्या स्वराने तंद्रीतून जागा करतो.
(सर्व छायाचित्रे सौजन्य : दीपेश रंजना दामोदर बागडे डाकराम सुकळी ता़ तिरोडा)