GADCIROLI POLICE l October 22, 2024
गडचिरोली जिल्ह्यात सोमवारी चकमकीत ठार झालेल्यांमध्ये नक्षलवाद्यांमध्ये दोन मोठ्या म्होरक्यांचा समावेश आहे. दोघांवरही प्रत्येकी १६ लाख रुपयांचे बक्षीस होते़ या सर्वांची ओळख पटल्यानंतर पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी आज या संदर्भात माहिती दिली.
जया उर्फ भुरी पदा आणि सावजी उर्फ अंकलू तुलावी हे दोघे सोमवारी चकमकीत मारले गेले. तसेच, ते विभागीय समितीचे सदस्य होते. दरम्यान, या दोघांशिवाय आणखी तिघे चकमकीत मारले गेले असून, त्यांच्यावर प्रत्येकी दोन लाख रुपयांचे बक्षीस होते, असेही अधीक्षक नीलोत्पल यांनी सांगितले.
TAPORI TURAKI न बघताच तुमच्याशी लग्न केलं…
गडचिरोलीतील भामरागड तालुक्यातील कोपरी हा शेवटच्या जंगल परिसर आहे. या जंगलात अधिक संख्येत नक्षलवादी असल्याचा गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर ‘सर्च आॅपरेशन’ राबविण्यात आल्याची माहिती आहे.
दरम्यान, महाराष्ट्र आणि ओडिशात माओवादी संघटनेसाठी काम करणाºया जोडप्याने दोन दिवसांआधी शरणागती पत्करली होती. या दोघांना पकडण्यासाठी आठ लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते़
आता त्यांच्याकडून अनेक नक्षली कारवाईचे खुलासे होण्याची शक्यता अधिकाºयांनी वर्तवली आहे.
CINERANG LOKBIMB शर्टाला गाठ, १५ रिटेक आणि दोन भावांतील संघर्ष …