झुळझुळ पाणी, गटाराचं पाणी
आणलं कुणी … सांगतो बाणी
हवायं डेंग्यू चिकुनगनिया
हीच आमची सदा वाणी
नको सुधारणा आम्हाला राणी
झुळझुळ पाणी, गटाराचं पाणी…
ऐका हो ऐका
आणलं आम्ही गटाराचं पाणी
तब्येत राही ठण ठणाणी …
प्रशासनाने गटारे दुरुस्ती वा साफसफाई करू नये़ लोकांना संसर्गजन्य आजारांची लागण होवू द्यावी, असे उपहासात्मक आवाहन ‘झुळझुळ पाणी, गटाराचं पाणी’ या विडंबनात्मक कवितेतून केल्याचे दिसून येत आहे़ सध्या पावसाळा सुरू आहे़ तर, कडक उन्हं सुद्धा तापत आहे़ अशा स्थितीत विविध आजारांची लागण होण्याची भीती असते़ नागरिकांना डेंग्यू, चिकुनगनियाची लागण होवू द्या, असे दर्शवत प्रशासन लोकांच्या जीवावर उठल्याची टीकाही या कवितेतून केल्याचे दिसून येते़
ही कविता सोशल मीडियातील ‘कम्मोसंजय’ [ kammosanjay ] या ‘एक्स’ हँडलवरून शेअर केली आहे. सोबतच व्हीडिओ सुद्धा शेअर केले आहेत.
सदर हँडलवर नागपूरचा उल्लेख असल्याने सदर व्हिडियो हा नागपुरातील असल्याची शक्यता आहे.