नागपूर : आपले कर्तव्य पार पाडताना देशभरातील महिला आणि पुरुष डॉक्टरांना सुरक्षा पुरविण्यात यावी, याबाबत निवेदन नागपूर शहर भाजपा वैद्यकीय आघाडीचे अध्यक्ष डॉ. गिरीश चरडे [ DR GIRISH CHARADE ] यांच्या नेतृत्वात राज्याचे गृहमंत्री तसेच पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले.
मागील दिवसांत पश्चिम बंगालमध्ये रात्रपाळीत कर्तव्यावर असलेल्या महिला डॉक्टरवर अमानूष अत्याचार करून हत्या करण्यात आली़ या दुर्दैवी घटनेचे देशांतील प्रत्येक शहर आणि ग्रामीण भागात संताप व्यक्त होत आहे़ बंगाल सरकारने तातडीने तपास करून दोषींना कठोर शिक्षा करण्याची मागणी होत आहे़
नागपुरात २२ बाय २२ फूट आकाराची राखी
नागपुरात आज डॉ. गिरीश चरडे यांच्या नेतृत्वात अनेक विद्यार्थ्यांनी पालकमंत्री देवेंद्र फडणवीस [ DCM FADANVEES ] यांच्या निवासस्थानी भेट घेत निवेदन सादर केले़ यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांसोबत संवाद साधत आपल्या भावना व्यक्त केल्या.
यावेळी विविध वैद्यकीय महाविद्यालयातील अभ्यासक्रमांतील विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.