NEWS OF DOORDARDARSHAN : देशातील प्रसारणाचा महत्त्वपूर्ण भाग असलेल्या दूरदर्शनने आज आपली ६५ गौरवशाली वर्षे पूर्ण केली आहे. १५ सप्टेंबर १९५९ रोजी स्थापन झालेल्या दूरदर्शनने भारताच्या प्रसारण युगाची सुरुवात केली. तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी पहिल्या प्रसारणाचे उद्घाटन केले होते. दूरदर्शनने आपल्या आतापर्यंत कारकिर्दींत अनेक बदल केलेत. अभिनयाचे नवे व्यासपीठ तयार करून अनेक कलाकार घडविले, जे आज लोकप्रिय ठरले आहे़ संगीत कार्यक्रम, महोत्सव आयोजित करून अनेकांना वेगाने पुढे आणले़ दूरदर्शनला खूप खूप शुभेच्छा …
DOORDARSHAN : भारतीय ‘दूरदर्शन’ने आज आपली ६५ गौरवशाली वर्षे पूर्ण केली आहे. १५ सप्टेंबर १९५९ रोजी स्थापन झालेल्या ‘दूरदर्शन’ने भारताच्या प्रसारण युगाची सुरुवात केली. तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद [ DR RAJENDRA PRASAD ] यांनी पहिल्या प्रसारणाचे उद्घाटन केले होते़ १९७५ पर्यंत दूरदर्शन हा ‘आकाशवाणी’चाच घटक होता. १ एप्रिल १९७६ रोजी दूरदर्शन ‘आकाशवाणी’पासून वेगळे होवून ‘माहिती आणि प्रसारण’ मंत्रालयाच्या एका स्वतंत्र विभागात रुपांतर झाले़ पुढील काळात ते प्रसार भारती अंतर्गत आले. [ 60 YEARS OF DOORDARSHAN ]
सरकारचे स्वायत्त सार्वजनिक सेवा प्रसारक असलेले दूरदर्शन हे प्रसार भारतीच्या [ PRASAR BHARATI ] दोन विभागांपैकी एक आहे. आजच्या घडीला दूरदर्शन आपल्या स्टुडिओ आणि ट्रान्समीटरच्या विशाल जाळ्यासह देशातील सर्वांत मोठी प्रसारण संस्था आहे. दूरचित्रवाणी, आॅनलाईन आणि मोबाइल सेवेबरोबरच दूरदर्शन महानगर, प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांपर्यंत पोहोचत आहे.
गडकरी आता ‘बदल’ करी, कोणता आणि कसा … वाचा
मागील काही वर्षांमध्ये ३५ उपग्रह वाहिनी चालवणाºया नेटवर्कमध्ये दूरदर्शनचा विस्तार झाला़ यात २४ तास चालणाºया ६ डीडी राष्ट्रीय वाहिन्या आणि २२ प्रादेशिक वाहिन्या आहेत. सोबतच ५९ ट्रान्समीटरसह डीडी, सहा प्रादेशिक आणि एक आंतरराष्ट्रीय वाहिनी चालवत असते. या शिवाय डीडी डीटीएच सेवा उपलब्ध आहे.
TAPORI TURAKI चिंटू अपना होमवर्क याद करके नहीं आया…
कृष्णधवल दूरचित्रवाणीच्या [ BLACK AND WHITE DOORDARSHAN ] काळापासून ते डिजिटल आणि सॅटेलाइट प्रसारणाच्या सध्याच्या युगापर्यंत दूरदर्शनने आपल्या विविध स्तरांमधील प्रेक्षकांची बदलती अभिरुची आणि प्राधान्यक्रम पूर्ण करण्यासाठी स्वत:चा सातत्याने विकास केला आहे.