SUDHAKAR KOHALE : महाराष्ट्र विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त १२ जागांसाठी महायुतीकडून जागांवर चर्चा सुरू असतानाच माजी आमदार तसेच भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे यांचे नाव समोर आले आहे. मात्र, पक्षाच्या या फॉर्म्युल्यावर ते सहमत होईलच, अशी विद्यमान राजकीय स्थिती नागपुरात नक्कीच नसल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.
उद्धव ठाकरे सरकारच्या सत्ताकाळात महाविकास आघाडी सरकार आणि तत्कालीन राज्यपाल यांच्या संघर्षात विधान परिषदेच्या १२ राज्यपाल नियुक्त जागा अडगळीत पडल्या होत्या. आता त्या भरण्यासाठीच्या हालचालींना वेग आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ज्येष्ठ नेते खा. प्रफुल्ल पटेल यांच्यात मागील दिवसांत जागांबाबत चर्चा पार पडल्याची माहिती आहे. यात भाजपाला सहा शिंदे शिवसेना आणि अजित पवार गटाला प्रत्येकी तीन जागा मिळणार असल्याचे समजते.
राज्याच्या भारतीय जनता पार्टीकडून चाचपणी सुरू असलेल्या उमेदवारांत नागपुरातील माजी आमदार सुधाकर कोहळे, राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर, महिला आघाडीच्या अध्यक्ष चित्रा वाघ, आध्यात्मिक आघाडीचे अतुल भोसले, नाशिकचे बाळासाहेब सानप आणि हर्षवर्धन पाटील यांचा समावेश आहे.
दुसरीकडे राजकीय जाणकार म्हणतात, पक्षाच्या प्रस्तावावर सहमत होईल, अशी स्थिती वा मनस्थिती सुधाकर कोहळे यांच्या बाजूने नक्कीच नाही.
महिलाविरोधी चेहरा पुन्हा उघड,भाजपा जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळेंनी लावली ‘या’ पक्षाला फटकार
मास लीडर
सुधाकर कोहळे ‘लोकनेता ’अर्थात मास लीडर आहेत. लोकांत मिसळणे, हा त्यांचा स्वभावगुण आहे़ म्हणूनच ते लोकांत, आपल्या मतदारांत अतिशय लोकप्रिय आहे़ आपला कार्यकर्ता वा आपला मतदार,अशी त्यांची दृष्टी नसून सर्वसामान्य व्यक्ती म्हणून ते कुणाचेही काम करत असल्याचा अनुभव अनेकांना आलेला आहे.
याशिवाय त्यांना लोकांतून निवडून येत लोकांसाठी कामे करणे अधिक पसंत आहे. ‘मागील दारा’चा वापर करून राज्याच्या विधिमंडळात शिरण्याचा प्रकार त्यांना जवळ जवळ मान्य नाहीच, असे त्यांचे समर्थक सांगतात़
मागील निवडणूक
२०१४ साली काँग्रेसने दिग्गज नेते सतीश चतुर्वेदी यांना दक्षिणेत उतरविले. तर, भाजपाने सुधाकर कोहळे यांना ‘संधी’ दिली़ त्यांनीही ‘सोने’ करत त्यांनी तब्बल ४३ हजार २१४ मतांनी सतीश चतुर्वेदींना पराभूत केले होते. २०१९मधील निवडणुकीत उमेदवारी नाकारल्यामुळे सुधाकर कोहळे यांचा समर्थक मतदार निश्चितच नाराज झाला.
अन्य उमेदवार मोहन मते यांनी ८४ हजार ३३९ मते मिळविली़ गिरीश पांडव ८० हजार ३२६ मतांसह दुसºया क्रमांकावर राहिले़ अर्थात या दोन्ही उमेदवारांतील विजयातील फरक ‘फार’ अंतराचा नाही. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योग्यवेळी जोर लावल्याने मोहन मते ‘विजयस्थ’ झाले. असे असले तरी पक्षाची मते घटली, ही बाब दुर्लक्ष करण्याजोगी नाही. त्यामुळे सुधाकर कोहळे यांना सामन्याला सामोरे न नेता, संघर्ष न करता अन्य मार्गाने आमदारकी देणे म्हणजे पायावर दगडधोंडे मारून घेण्यासारखे असल्याचे राजकीय जाणकार सांगतात़
दुसरीकडे पक्षनेतृत्वाला दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघासाठी ‘छान के’ उमेदवारी जाहीर करावी लागणार आहे़ तरच,पक्ष आणि मतदारांसाठी राजकीयदृष्ट्या ‘छान केल्यासारखे’ होईल, असेही सांगण्यात येते़