धनगर समाजातील विद्यार्थ्यांना स्वयंम योजनेसाठी मोठी संधी

Spread the love

NAGPUR : इयत्ता बारावी नंतरच्या मान्यता प्राप्त तंत्र शिक्षण तसेच व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयामध्ये केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेव्दारे प्रवेश घेतलेल्या परंतु शासकीय वसतीगृहामध्ये प्रवेश न मिळालेल्या धनगर समाजातील विद्यार्थ्यांना पंडीत दीनदयाल उपाध्याय स्वयंम [ SWAYAM ] योजनेअंतर्गत भोजन, निवास व इतर शैक्षणिक साहित्य उपलब्ध करुन घेण्यासाठी विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बैंक खात्यामध्ये थेट रक्कम वितरण करण्यास मान्यता देण्यात आली  आहे. या योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

काही नियम / अटी

विद्यार्थी धनगर समाजातील असावा. इयत्ता बारावीमध्ये किमान ६० टक्के गुण मिळालेले विद्यार्थी या योजनेस पात्र राहतील.

योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी संबंधित विद्यार्थ्यांने इयता १२ वी नंतर मान्यताप्राप्त तंत्र शिक्षण तसेच व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयामध्ये केंद्रिभूत (CAP) प्रवेश प्रक्रियेव्दारे प्रवेश घेतलेला असावा.

विद्यार्थ्यांने अर्जासोबत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील. विद्यार्थ्यांच्या पालकाचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावे.

विद्यार्थ्यांने प्रवेश घेतलेली शैक्षणिक संस्था ज्या शहराच्या ठिकाणी आहे. अशा शहरातील विद्यार्थी रहिवासी नसावा.

विद्यार्थी हा नागपूर जिल्हयातील महाविद्यालयामध्ये शिक्षण घेणारा असावा.

विद्यार्थ्यास इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या, सामाजिक न्याय विभागाच्या, आदिवासी कल्याण विभागाच्या किंवा संबंधित शैक्षणिक संस्थेच्या वसतीगृहामध्ये मोफत प्रवेश मिळालेला नसावा.

READ ALSO

सबसे ज्यादा नशा किसमें होता है ? TAPORI TURAKI

एका विद्यार्थ्यास ५ वर्ष सदर योजनेचा लाभ घेता येईल. सदर योजनंचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांचे कमाल वय २८ पेक्षा जास्त नसावे. अभ्यासक्रमाच्या मध्यावधी प्रवेश घेतलेला विद्यार्थी योजनेअंतर्गत लाभास पात्र असेल. शिक्षणात खंड पडलेला विद्यार्थी लाभास पात्र असेल तथापि, सदर विद्यार्थी योजने अंतर्गत निश्चित केलेल्या वयोमर्यादेपेक्षा अधिक वयाचा नसावा. निवड करण्यात आलेला विद्यार्थी संबंधित अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यत लाभास पात्र राहील. मात्र विद्यार्थ्यास प्रत्येक वर्षी त्या-त्या अभ्यासक्रमाच्या परीक्षेत उत्तीर्ण होणे अनिवार्य राहील.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित विद्यार्थ्यांस ऑफलाईन पध्दतीने संबंधित सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, नागपूर यांचेकडे अर्ज करणे अनिवार्य राहील. तरी सदर योजनेकरीता तत्काळ अर्ज सादर करण्यात यावे असे आवाहन सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण राजेंद्र बुजाडे यांनी केले आहे.

lokbimb online team

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

नागपुरात नितीन गडकरींच्या उपस्थितीत सामूहिक योगाभ्यास

Fri Jun 21 , 2024
Spread the love नागपूर : महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने जागतिक योग दिनानिमित्त सामूहिक योगाभ्यास कार्यक्रमाचे आयोजन धंतोली स्थित यशवंत स्टेडियम येथे शुक्रवारी पार पडले. कार्यक्रमाच्या प्रारंभी शालेय विद्यार्थ्यांनी योगासनाची लक्षवेधक सामूहिक प्रात्यक्षिके सादर केली. जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळाचे प्रमुख रामभाऊ खांडवे यांनी निरोगी जीवनासाठी योगाचे महत्त्व विशद केले. […]

You May Like

Chief Editor

Johny Watshon

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua. Ut enim ad minim veniam, quis nostrud exercitation ullamco laboris nisi ut aliquip ex ea commodo consequat. Duis aute irure dolor in reprehenderit in voluptate velit esse cillum dolore eu fugiat nulla pariatur

Quick Links