नागपूर : नर्सिंग, हॉटेल मॅनेजमेंट यासह ३० क्षेत्रापैकी कुठला अभ्यासक्रम केला असल्यास थेट जर्मनीत नोकरी मिळणार आह़े महाराष्ट्रातील बेरोजगार युवकांना युरोपातील जर्मनी देशात नोकरीची [ JOB IN GERMANY ] संधी उपलब्ध करून दिली आहे.
शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या 11 जुलैच्या शासन निर्णयान्वये महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील 10 हजार कुशल मनुष्यबळ जर्मनीतील बाडेन बुटेनबर्ग या राज्याला पुरविण्यात येणार आहे.
आरोग्यसेवा, हॉटेलिंग व्यवसाय, क्राफ्ट्समन यासह इतर विविध 30 क्षेत्रातील कुशल मनुष्यबळ जर्मनीला पुरविण्यात येणार आहे. या माध्यमातून महाराष्ट्रातील बेरोजगार युवकांना युरोपात नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. अधिक माहिती https://www.maa.ac.in/GermanyEmployment/ या संकेतस्थळावर उपलब्ध असून, संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.