आरक्षण कायदा लागू न झाल्याचा परिणाम
महाराष्ट्रातील ७ महिला पोहोचल्या सभागृहात
महिला राजकीय आरक्षण कायदा लागू न झाल्याने लोकसभेत ‘स्त्री राजशक्ती’ कमी पडली आहे. यंदा महाराष्ट्रातील ७ महिला खासदार बनून लोकसभेत पोहोचल्या असून, यापैकी केवळ एका महिला सदस्याच्या वाट्याला केंद्रीय मंत्रिपद आले आहे.
by : lokbimb news desk l edited by : shilpa mundalkar l 13rd June 2024
WOMEN MPs IN LOKSABHA 2024 : यंदाच्या १८ व्या लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून देशभरातील ७४ महिला खासदार सभागृहात पोहोचल्या आहेत़ यापैकी फक्त ७ महिला सदस्यांना केंद्रीय मंत्रिपद देण्यात आले़ त्यामुळे महिला आरक्षणासंदर्भातील एक तृतीयांश जागा राखीव ठेवण्याच्या तरतुदीचा विसर पडला की काय, अशी चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.
यंदा देशभरातून एकूण ७९७ महिला उमेदवारांनी निवडणूक लढवली होती. यापैकी ७४ महिला खासदार लोकसभेत पोहोचल्या आहेत़ तर, मागील लोकसभा निवडणुकीद्वारे (२०१९) ७८ महिला खासदार लोकसभेत पोहोचल्या होत्या़ भारतीय जनता पार्टीने १८ व्या लोकसभा निवडणुकीसाठी सर्वांत जास्त म्हणजे ६९ महिलांना उमेदवारी (एकूण ५४३ जागांपैकी १२.७० टक्के) दिली होती़ काँग्रेस पक्षाकडून ४१ महिलांना (एकूण ५४३ जागांपैकी ७.५५ टक्के) निवडणूक रिंगणात उतरविण्यात आले़
CINERANG LOKBIMB दिल के अरमां आसुओं में बह गए…
जिंकल्या किती
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या ३१महिलांनी खासदारकी मिळविली आहे. काँग्रेसच्या १३ महिला नेत्या जिंकल्या आहेत. तृणमूल काँग्रेसच्या ११, समाजवादी पार्टीच्या पाच, द्रमुक तीन आणि जनता दल (यू), लोकजनशक्ती पार्टीच्या प्रत्येकी दोन महिला उमेदवारांनी विजय मिळविला. याशिवाय अन्य सात पक्षातील प्रत्येकी एका उमेदवाराचा समावेश आहे. (यात शरद पवार गटातील उमेदवाराचा समावेश)
चढती-घटती
१५ व्या लोकसभेत (२००९) देशभरातील महिला खासदारांची संख्या ५२ इतकी होती. १६ व्या लोकसभेत (२०१४) ६४ महिला सदस्य, तर १७ व्या लोकसभेतील (२०१९) ही संख्या सर्वाधिक ७८ अर्थात एकूण संख्येच्या १४ टक्के इतकी होती. यंदाच्या निवडणुकीत भाजपा नेत्या हेमा मालिनी, तृणमूल काँग्रेसच्या महुआ मोईत्रा, शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे, समाजवादी पार्टीच्या डिम्पल यादव पुन्हा निवडून आल्या आहेत. दुसरीकडे कंगना राणावत, मिसा भारती पहिल्यांदाच विजयी झाल्या आहेत. उत्तर प्रदेशातील मछलीशहर मतदारसंघातून समाजवादी पार्टीच्या प्रिया सरोज (वय २५) आणि कैरानामधून इकरा हसन (वय २९) या दोन्ही उमेदवार देशातील सर्वांत कमी वयाच्या आहेत.
CINERANG LOKBIMB शर्टाला गाठ, १५ रिटेक आणि दोन भावांतील संघर्ष …
कायद्याचे काय?
संसदेत महिला आरक्षण विधेयक मंजूर झाल्यानंतरची यंदाची पहिलीच निवडणूक होती. महिलांना लोकसभा आणि विधानसभेत एक तृतीयांश जागा राखीव ठेवण्याची तरतूद या कायद्यात आहे. मात्र, हा कायदा अद्याप लागू झालेला नाही.
महाराष्ट्रातून सुप्रिया सुळे (चौथ्यांदा विजयी), रक्षा निखिल खडसे(तिसºयांदा विजयी) प्रतिभा धानोरकर, स्मिता वाघ, शोभा बच्छाव, वर्षा गायकवाड, प्रणिती शिंदे (सर्व पहिल्यांदा विजयी) लोकसभेत पोहोचल्या आहेत़ तर रक्षा खडसे यांना युवा कल्याण आणि क्रीडा राज्यमंत्रिपद मिळाले आहे. दुसरीकडे पंकजा मुंडे BEED, हीना गावित NANDURBAR, भारती पवार DINDORI, नवनीत राणा AMARAVATI (सर्व भाजपा) पराभूत झाल्या़
दरम्यान, मागील काही वर्षांपासून जुन्याच नावांवर विचार होत असून, नवे नेतृत्व तयार करण्याची गरज निर्माण झाल्याचा मतप्रवाह सुद्धा आहे.