नाही नाही … म्हणता म्हणता काँग्रेसची विधानसभा निवडणुकीतील 48 उमेदवारांची यादी घोषित झाली आहे. नागपुरातील सहापैकी चार जागांवर काँग्रेस, तर एक जागा राष्ट्रवादी काँगे्रस शरद पवार पक्षाच्या वाट्याला गेली आहे़ मात्र, दक्षिण नागपूरबाबत ‘सस्पेन्स’ कायम ठेवण्यात आला आहे़
राज्यभरात सर्वांची उत्सुकता ताणली असतानाच काँग्रेसने पहिली उमेदवारी यादी जाहीर केली आहे. पहिल्या उमेदवारी यादीमध्ये 48 उमेदवारांचा समावेश आहे. यात नागपुरातील सहापैकी चार मतदारसंघातील उमेदवार जाहीर केले असून, एक जागाला राष्ट्रवादीला (शरद पवार गट) मिळाली आहे़
TAPORI TURAKI पण जरा झणझणीत बनवा. भिवापुरी मिर्ची
उत्तर नागपूर मतदारसंघातील मागील निवडणुकीतील उमेदवार तसेच आमदार नितीन राऊत यांना पुन्हा एकदा संधी मिळाली आहे़ पश्चिम नागपूरमध्ये विद्यमान आमदार विकास ठाकरे पुन्हा एकदा आमदार बनण्याच्या तयारीत आहेत़ मध्य नागपूरमध्ये बंटी शेळके यांची एन्ट्री झाली आहे. तर, दक्षिण पश्चिममध्ये प्रफुल्ल गुडधे यांना संधी देण्यात आली आहे़ त्यांचा थेट सामना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत होणार आहे़
TAPORI TURAKI झूठे, धोखेबाज, मक्कार, नालायक तुम तो कह रहे थे, नहीं रहने दो! तीन ही काफी हैं …
येथे सस्पेन्स
दक्षिण नागपूरबाबत अद्याप निर्णय झाला नसून, ‘सस्पेन्स’ कायम ठेवण्यात आला आहे़ दक्षिण नागपूर मतदारसंघावर शिवसेना उद्धव ठाकरे गटाने दावा ठोकला आहे़ या जागेवर गिरीश पांडव यांचे समोर येत असतानाच कदाचित शिवसेनाच्या वाट्याला गेल्यास प्रमोद मानमोडे नशिबवान ठरू शकतात़ दुसरीकडे ही जागा कोणत्याही परिस्थितीत काँगे्रसलाच मिळणार असल्याचा जोरदार दावा गिरीश पांडव यांचे समर्थक करत आहेत़