FOGGING IN NAGPUR : पावसाळा सुरू झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात डासांचा प्रकोप वाढतो. यातूनच डेंग्यू, चिकनगुनिया या सारखे जीवघेणे आजार डोके वर काढतात. डेंग्यू व चिकनगुनिया नियंत्रणासाठी आरोग्य विभाग सज्ज असून, मनपाद्वारे डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी प्रभाग निहाय ‘फॉगिंग’ [ FOGGING IN NAGPUR ] आणि ‘स्प्रेईंग’ वर भर दिला जात आहे. नागरिकांनी देखील परिसरात पाणी साचणार नाही याची काळजी व्हावी, असे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.
मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी [ DR. ABHIJEET CHAUDHARI IAS ] यांनी सांगितले की, नागपूर शहरात डेंग्यू आणि चिकनगुनियाचा वाढत प्रसार रोखण्यासाठी नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाद्वारे वेगवेगळ्या उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. सध्यस्थितीत शहरात चिकनगुनियाचे ४३५ रुग्ण व डेंग्यूचे १०५ रुग्ण आहेत.
या जन्मात हसणं कुणालाच चुकले नाही …TAPORI TURAKI
मनपाने धूर फवारणी (फॉगिंग) आणि ‘स्प्रेईंग’ करण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळाची दिले असून, घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या 50 कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. तसेच जीपीएस ट्रॅकर असणाऱ्या 10 फॉगिंग गाडीवर झोन निहाय तैनात करण्यात आल्या आहेत. याद्वारे दररोज सकाळी आणि संध्याकाळी फॉगिंग करण्यात येत आहेत.
TAPORI TURAKI बहन मुझे बन्दर कहकर चिढ़ाती है…
याशिवाय मनपाच्या दहाही झोन निहाय रॅपिड रिस्पॉन्स टीमचे तैनात करण्यात आली आहे. ज्या ठिकाणी डेंग्यू चिकनगुनिया सारख्या आजाराचे संशयित रुग्ण आढळून आले आहेत, अशा ठिकाणी चमूद्वारे त्वरित कंटेनर सर्वेक्षण, धूर फवारणी ‘स्प्रेईंग’ सारख्या उपाययोजना राबविल्या जात आहेत. तसेच, आशा सेविकांद्वारे घरोघरी सर्वेक्षण करत आहे.