नागपूर, 30 जून 2024
केंद्रिय सामाजिक न्याय आणि अधिकारीता मंत्रालयाच्या अंतर्गत नागपूरच्या धंतोली येथील यशवंत स्टेडियम मधील कम्पोझिट रिजनल सेंटर फॉर स्किल डेव्हलपमेंट, रिहॅबिलिटेशन अँड एम्पॉवरमेंट ऑफ पर्सन विथ डिसेबिलिटीज (CRC-नागपूर) तर्फे दिव्यांग व्यक्तींसाठी आरोग्य तपासणी शिबिर सोमवार, 1 जुलै रोजी आयोजित केले जाणार आहे. हा कार्यक्रम राष्ट्रीय डॉक्टर दिनाच्या दिवशी आयोजित करण्यात आला आहे .
डॉ. रितिका खरे MBBS, MD (बालरोगतज्ञ) फेलोशिप इन निओनॅटोलॉजी PGPN (बोस्तान) आणि डॉ. हर्ष चुटके, MBBS, जनरल फिजिशियन ESIC हॉस्पिटल, नागपूर हे सर्वसाधारण तपासणी करतील आणि दिव्यांग व्यक्तिला सल्ला देतील.
CINERANG LOKBIMB शर्टाला गाठ, १५ रिटेक आणि दोन भावांतील संघर्ष …
सोमवार 1 जुलै रोजी 2024, सकाळी 10:30 ते दुपारी 12:30 पर्यंत दिव्यांग व्यक्ति, त्यांचे पालक आणि काळजीवाहक यांना आरोग्य तपासणी शिबिरांमध्ये सहभागी होण्यासाठी तसेच प्रसिद्ध डॉक्टरांकडून आरोग्य मूल्यांकन आणि विनामूल्य सल्ला घेण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे.
कार्यक्रमाला डॉ. अपर्णा भालेराव, सहाय्यक प्राध्यापिका क्लिनिकल सायकोलॉजिस्ट, कु. कविता सूर विशेष शिक्षक, सौ. एल. अनुरुपा सहाय्यक प्राध्यापक वाचा व श्रवण, राजेंद्र मेश्राम पुनर्वसन अधिकारी सीआरसी नागपूर यांचे सहकार्य लाभले आहे.
READ ALSO