PROUD TO NAGPUR : केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी भारतीय मानांकने २०२४ अहवाल जारी केला असून, यात नागपुरातील सहकार, तंत्रज्ञान, वैद्यकीय क्षेत्रातील संस्थांना मोठा सन्मान मिळाला आहे़ भारतातील उच्च शिक्षण संस्थांच्या भारतीय मानांकनाचा अहवाल जारी होण्याचे हे सलग नववे वर्ष आहे.
देशातील १०० उत्कृष्ट व्यवस्थापन संस्थांमध्ये महाराष्ट्रातील नऊ संस्थांचा समावेश आहे. यात अन्यसह इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेन्ट नागपूरला [ IIM NAGPUR ] ३१ वे स्थान मिळाले आहे.
देशातील उत्कृष्ट १०० औषधीय संस्थांमध्ये महाराष्ट्रातील १६ संस्थांचा समावेश आहे. यात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर (५१ वे स्थान), श्रीमती किशोरीताई भोयर कॉलेज आॅफ फार्मसी नागपूर, (६१ वे स्थान) या दोन संस्थांना सन्मान मिळाला आहे़
दंत महाविद्यालयांच्या रँकिंग मध्ये देशातील ४० महाविद्यालयांमध्ये महाराष्ट्रातील सहा महाविद्यालयांचा समावेश झाला आहे. यात नागपुरातील शासकीय दंत महाविद्यालय (डेन्टल कॉलेज) १५ व्या स्थानी आहे़ वास्तुकला आणि नियोजन या श्रेणीमध्ये विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था नागपूर [ VNIT NAGPUR ] या संस्थेने दहावे स्थान मिळवले आहे. देशातील ३० सर्वोत्कृष्ट विधी महाविद्यालयांमध्ये राष्ट्रीय विधी विद्यापीठ (लॉ युनिव्हर्सिटी) नागपूर संस्थेला ३४ व्या क्रमांकावर आहे.
TAPORI TURAKI तू सुंदर परी,यातच जाते…
वर्धा, अमरावतीलाही सन्मान
महाविद्यालयांच्या रँकिंगमध्ये देशातील १०० संस्थांमध्ये महाराष्ट्रातील चार महाविद्यालयांचा समावेश आहे. यात अमरावती येथील श्री. शिवाजी विज्ञान महाविद्यालयाने ९९ वे स्थान प्राप्त केले आहे. दंत महाविद्यालयांच्या रँकिंग मध्ये देशातील ४० महाविद्यालयांमध्ये वर्धा येथील दत्ता मेघे उच्च शिक्षण आणि संशोधन संस्थेला २४ वे स्थान मिळाले आहे.
१३ श्रेणींचा समावेश
शिक्षण, शिक्षण आणि संसाधने, शोध आणि व्यावसायिक कार्यप्रणाली, पदवी परिणाम, संपर्क आणि समावेशिता, कल्पना या मापदंडांवर एकूण १३ श्रेणींमध्ये सर्वोत्कृष्ट संस्थांची यादी जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे वर्ष २०२४ पासून तीन नवीन श्रेणींचा समावेश करण्यात आला असून, यात राज्यांतील सर्वोत्कृष्ट विद्यापीठे, सर्वोत्कृष्ट मुक्त विद्यापीठे आणि कौशल्य विद्यापीठांचा समावेश करण्यात आला.