NAGPUR, RAMTEK LOKSABHA ELECTION 2024 : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यात ग्रामीण व शहरी भागांमध्ये मतदारांचे पध्दतशीर शिक्षण आणि निवडणूक सहभाग कार्यक्रम (SVEEP) प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून विशेष पुरस्कारही यासाठी ठेवण्यात आले आहे.
रिल मेकींग कॉम्पीटेशन (Reel Making Competition), 18 वर्षावरील पहिल्यांदा मतदान करणाऱ्या युवकांसाठी माझे पहिले मत देशासाठी, मी स्वाभिमानी मतदार, स्पर्धा, अपार्टमेंट/ हाऊसिंग सोसयटीसाठी तीन श्रेणीमध्ये स्पर्धा, औद्योगिक क्षेत्रासाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धांमध्ये सर्व गटातील युवा व इतर मतदारांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विपीन इटनकर DR. VIPIN ITANKAR व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले आहे.
अशा आहेत स्पर्धा
नवमतदारसाठी रिल मेकींग कॉम्पीटेशन
या स्पर्धेचा विषय ” मेरा पहिला वोट देश के लिए ” व “मी आहे स्वाभिमानी मतदार” असा आहे. यामध्ये नागपूर जिल्हयातील सर्व १८ ते ३० वयोगटातील युवक युवतींना सहभागी होता येईल. आपल्या सोशल मिडिया अकॉऊंटमध्ये रिल्स व इतर निर्मिती अपलोड करतांना यामध्ये चुनाव का पर्व, देश का गर्व, वोट करेगा नागपूर, मेरा पहिला वोट देश के लिए या हॉशटॅगचा वापर करावा. नागपूर स्विप आणि जिल्हा निवडणूक कार्यालय इंस्टाग्राम (डिईओ नागपूर), फेसबुक(डिईओ नागपूर), व्टिटर (डिईओ नागपूर) यांना टॅग करावे. या कार्यक्रमाचा कालावधी ३१ मार्च २०२४ राहील. आणि ज्या रिलला सर्वात जास्त प्रतिसाद मिळेल अश्या रिल जिल्हा निवडणूक विभागामार्फत अंतिम करुन आफिशियल रिल म्हणून प्रसिध्द होणार आहे. आपली नोंदणी सोबत दिलेल्या sveepngp2024@gmail.com या ईमेलवर व https://rb.gy/tlddtv या लिंकवर अपलोड करण्यात यावी. नागपूर विद्यापीठ अंतर्गत शाळा व महाविद्यालयात व्होटींग स्पर्धाचे VOTING COPMITIONS आयोजन करण्यात आले आहे.
नागपूर विद्यापीठ अंतर्गत स्पर्धा
या स्पर्धेचा विषय मेरा पहिला व्होट देश के लिए व आय एम प्राऊड व्होटर असा राहील. ही स्पर्धा नागपूर जिल्हयातील शिक्षण घेणाऱ्या १८ वर्षावरील विद्यार्थ्यांकरिता आहे. या स्पर्धेत दिलेले उपक्रम दिनांक २१ एप्रिल पर्यंत करावे लागतील. सर्व शैक्षणिक शाळा आणि कॉलेज मधील युवा मतदारांनी १०० टक्के मतदान करण्यासाठी शपथ घेणे. शैक्षणिक संस्थामधील पालक-शिक्षक समितीने “आपले बुथ ओळखा” हा उपक्रम राबविणे. पालक वर्गाला जास्तीत जास्त प्रमाणात मतदान करण्यासाठी प्रेरित करणे, खाजगी शिकवणी वर्गामधील नवीन मतदारांना सहभागी करणे, विद्यार्थ्यांमध्ये मतदान जागृती वाढविण्यासाठी शाळा व कॉलेज यामध्ये निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा आयोजित करणे हे उपक्रम यात आहेत. याच बरोबर युवा वर्ग आणि सांस्कृतीक कार्यक्रमांमध्ये SVEEP उपक्रम राबविणे, पूर्व प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी जनजागृती अभियान राबविणे, जास्तीत जास्त नाव नोंदणी करणे, त्यांना मतदानाकरिता प्रोत्साहीत करणे व मतदानाची टक्केवारी वाढवून जास्तीत जास्त मतदान होईल याकरिता प्रयत्न करणे आदी बाबी अंतर्भूत असतील.
ज्या शाळा व कॉलेजला सर्वात जास्त मतदान होईल त्यामधील तीन शाळा व कॉलेज जिल्हा निवडणूक विभागामार्फत अंतिम करुन त्यांचा स्मृती चिन्ह व प्रशस्तीपत्र देवून गौरव करण्यात येईल. नोंदणी https://rb.gy/grxvem या गुगल ड्राईव्ह लिकला करण्यात यावी. नोंदणी करतांना काही अडचण निर्माण झाल्यास sveepngp२०२४@gmail.com या ई-मेल आयडीवर अडचण नोंदविता येईल.