CM EKNATH HINDE l October 19, 2024
परतीच्या पावसामुळे राज्याच्या विविध भागात मागील काही दिवसांत झालेल्या शेतीच्या तसेच इतर नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत़ नुकसानग्रस्तांना तत्काळ भरपाई द्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिले आहे़
अमरावती, पुणे, नाशिक, कोल्हापूर, मराठवाडा आदी विविध भागातील विविध जिल्हे किंवा तालुक्यांमध्ये मागील काही दिवसांत मुसळधार पाऊस कोसळला. काही ठिकाणी वादळी वारे आणि पावसामुळे शेतपिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
यात प्रामुख्याने भात, सोयाबीन, तूर, कपाशी, ऊस आदी विविध प्रकारच्या पिकांसह फळबागांचेही नुकसान झाले आहे. या सर्व नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्यात यावेत. नुकसानग्रस्तांना भरपाई देण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.