TOURISM AMBASSADOR : राज्यातील पर्यटन स्थळांची अधिकाधिक होण्यासाठी माजी मिस इंडिया युनिव्हर्स नवेली देशमुख हिची २०२४-२५ या वर्षाकरिता राज्याची पर्यटन सदिच्छा दूत म्हणून राज्य शासनाने नियुक्ती केली आहे. नवेली देशमुख राज्यभरात ‘पर्यटन सदिच्छा दूत’ [ YOUTH ICON ] म्हणून राज्यातील पर्यटन स्थळांच्या अधिकाधिक प्रचारासाठी सहभागी होणार आहे.
नवेली देशमुख या छत्रपती संभाजीनगर येथील असून, ‘यूथ आयकॉन’ म्हणून विविध शासकीय विभागात योगदान देणार आहे. राज्यातील पर्यटन स्थळांची जास्तीत जास्त प्रचार व प्रसिध्दी करण्यासाठी त्या पर्यटन विभागामार्फत राबविण्यात येणाºया विविध पर्यटन महोत्सव,रोड शो विविध कार्यक्रमात सहभागी होईल.
या संदर्भात नवेली म्हणाली, की राज्यातील पर्यटन स्थळांची जास्तीत जास्त प्रचार व प्रसिद्धीसाठी प्रयत्न करेन. नव्या पिढीची आयकॉन म्हणून काम करताना युवा पिढीला साजेसे प्रचाराचे उपक्रम पर्यटन विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येतील. शाश्वत विकासासाठी पर्यावरणपूरक पर्यटनाला महत्व देण्यासाठी तसेच जबाबदार पर्यटनाची प्रसिद्धी आणि प्रचार करण्यात येईल.