दर्जेदार शिक्षण अधिक सुलभपणे उपलब्ध होण्याची संधी
PHYSICS WALLAH l October 18, 2024
नागपूर : फिजिक्सवाला PHYSICS WALLAH [ PW ] ही भारतातील आघाडीची मल्टीनॅशनल एडटेक कंपनी भारतात किफायतशीर, उच्च दर्जाच्या शिक्षणाचे लोकशाहीकरण करण्याप्रति कटिबद्ध आहे. कंपनीने शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी देशभरात 77 हून अधिक आॅफलाईन तंत्रज्ञान-सक्षम अध्ययन केंद्रांच्या लाँचची घोषणा केली आहे. या संदर्भात आज पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली.
नवीन केंद्र तामिळनाडू, गुजरात, जम्मू व काश्मीर, राजस्थान, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये कार्यरत असतील. या विस्तारीकरणासह पीडब्ल्यूची आॅफलाईन फूटप्रिंट दुप्पट होऊन 141 शहरांमध्ये 203 केंद्रे असतील, ज्यामुळे सध्याच्या 126 विद्यापीठ व पाठशाला केंद्रांत अधिक भर होईल. या धोरणात्मक विस्तारीकरणाच्या माध्यमातून पीडब्ल्यूचा दर्जेदार शिक्षण अधिक प्रमाणात उपलब्ध करून देण्याचा विचार आहे.
TAPORI TURAKI पण मी तुमची डाळ शिजू देणार नाही…
शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये दोन लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी पीडब्ल्यूच्या विद्यापीठ आणि पाठशालामध्ये नोंदणी केली, ज्यामधून संपूर्ण भारतात शिक्षणाचे लोकशाहीकरण करण्याप्रती पीडब्ल्यूच्या मिशनवरील वाढता विश्वास दिसून येतो. पीडब्ल्यूचा आगामी शैक्षणिक वर्षात आणखी अडीच लाख विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचा मनसुबा आहे.
प्रत्येक विद्यार्थ्यांला प्रगती करण्यासाठी आवश्यक असलेले मार्गदर्शन व संसाधने प्रदान करण्याप्रति समर्पित आहे.शिक्षण सक्षमीकरणासाठी महत्त्वाचे साधन बनले असून, सर्वांना समान संधी देते. सध्या, पीडब्ल्यूचा एक विद्यार्थी देशभरातील प्रत्येक आयआयटी आणि एम्समध्ये सक्रिय आहे.
राज्यपालनियुक्त विधानपरिषद सदस्यांचा शपथविधी, विधानसभेसाठी संधी मात्र सुधाकर कोहळेंना …
पत्रपरिषदेला नागपूर सेंटर हेड जे.एस. चौहान आणि बिझनेस हेड नितेश माहेश्वरी उपस्थित होते.