विविध मतदारसंघात तरुणाईत उत्साह
काही मतदान केंद्रांवर मात्र गोंधळच गोंधळ
देशातील विरोधी पक्षांना सत्तेतील पक्षाला सत्तेतून बाहेर काढण्याची संधी पाच वर्षांतून एकदाच मिळते़ त्याच धर्तीवर पसंत नसलेल्या वा विकास करत नसलेल्या सरकारला खुर्चीतून बाहेर काढण्याची संधी मतदारांनाही पाच वर्षांतून एकदाच मिळत असते़ आता ती संधी सर्वांनी गमावली आहे़ मतदानाची टक्केवारी यातून बरेच काही सांगून जाते़ सोमवारी पार पडलेले मतदान सत्ताधाºयांना लाभदायक की विरोधीपक्षांना याबाबत ४ जून २०२४ रोजी अनुभवास येईल.
नागपूर:राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया सोमवारी संपुष्टात आली़ या टप्प्यात १३ लोकसभा मतदारसंघात सायंकाळी ६ वाजेपर्यंत अंदाजे सरासरी ५४.३३ टक्के मतदान झाले. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या वतीने या संदर्भात माहिती देण्यात आली.
दुसरीकडे पहिल्या चार टप्प्यांप्रमाणे सोमवारच्या अखेरच्या टप्प्यातील मतदानाचा शेवट निराशापूर्ण असल्याची भावना व्यक्त होत आहे.
पाचव्या टप्प्यातील एकूण १३ लोकसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी अशी आहे़ सर्वांत जास्त मतदान दिंडोरी (नाशिक) तर सर्वांत कमी मतदान कल्याण (ठाणे) मतदारसंघात झाले आहे. धुळे मतदारसंघात ५६.६१ टक्के झाले असून, दिंडोरीत ६२.६६ टक्के इतके झाले़ नाशिक लोकसभा मतदारसंघात ५७.१० टक्के, पालघरमध्ये ६१.६५ टक्के, भिवंडी येथे ५६.४१ टक्के, कल्याणमध्ये ४७.०८ टक्के, ठाणे येथे ४९.८१ टक्के, मुंबई उत्तर ५५.२१ टक्के, मुंबई उत्तर मध्य – ५१.४२ टक्के, मुंबई उत्तर पूर्व येथे ५३.७५ टक्के, मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात ५३.६७ टक्के, मुंबई दक्षिण ४७.७० टक्के आणि मुंबई दक्षिण मध्य याठिकाणी ५१.८८ टक्के मतदानाची नोंद झाली आहे़
LOKBIMB OFFBEAT माझंही स्टार्ट अप
Related news
LOKSABHA FIFTH PHASE पाचवा टप्पा सोमवारी, रेकॉर्डब्रेक मतदानाचे आवाहन
पाठ फिरविली
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, केंद्रीय मंत्री भारती पवार यांच्यासह अरविंद सावंत, राहुल शेवाळे, वर्षा गायकवाड, नव्यानेच भारतीय जनता पार्टीत नव्यानेच दाखल झालेले उज्ज्वल निकम, राजन विचारे, श्रीकांत शिंदे, हेमंत गोडसे अशी काही नवी जुनी आणि अत्यंत धुरंधर राजकारणी निवडणूक मैदानात असताना मतदारांनी मात्र पाठ फिरविल्याचे चित्र दिसून आले आह़े
मतदार गेलेत कुठे?
शिवसेना तसेच राष्ट्रवादीच्या फुटीनंतर या पक्षांसह अन्य पक्षांचे नेते आपल्या प्रचारसभांमध्ये स्थानिक मुद्यांवर ‘फोकस’ करतील, अशी अपेक्षा होती़ रोजगार, महागाई, भ्रष्टाचार, रस्ते, पाणीटंचाई, शेतमालास भाव, शेतकरी आत्महत्या, महिला अत्याचार, ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या, शैक्षणिक शुल्क, पारदर्शी परीक्षा आदी अनेक मुद्दे असताना कोणत्याही पक्षाने त्याकडे लक्ष न देता आरोप-प्रत्यारोप, टीका, विचित्र वक्तव्ये असे विविध प्रकार मतदारांना ऐकावयास मिळाले. त्यामुळे हताशता वा निराशा यासोबतच मतदानयादीतील घोळ आदींमुळे अनेकांनी मतदानाकडे पाठ फिरविल्याचे प्रथमदर्शी दिसून येते
अनेकजण परत
मुंबईतील अनेक मतदान केंद्रांवर गोंधळाची स्थिती होती़ निवडणूक ओळखपत्र तपासण्यात कर्मचाºयांनी सर्वांत जास्त खर्च केल्याने मतदान करण्याच्या प्रक्रियेला उशीर झाल्याचा आरोप होत आहे़ लोकमतने या संदर्भात वृत्त दिले आहे़त्यामुळे मतदारांनी कंटाळून घराचा रस्ता धरला़ मतदारांची उलटतपासणी केल्याचा आरोपही होत आहे़ काही मतदारसंघात बोगस मतदानाचा संशय सदर वृत्तात करण्यात आला आहे.