‘भारतातील महिला आणि पुरुष २०२३’ अहवालातून स्त्री-पुरुष समानतेच्या दिशेने केलेल्या प्रगतीवर प्रकाश टाकण्यात आला असून, विविध सामाजिक-आर्थिक निर्देशकांचे परीक्षण करण्यात आले आहे़ याद्वारे सरकार, संशोधक आणि सामान्य लोकांना माहितीपूर्ण निर्णय घेण्यास आणि स्त्री-पुरुष यांच्यासंबंधी संवेदनशील धोरणांच्या विकासामध्ये योगदानबाबत मदत होणार आहे.
News By : SHILPA MUNDALKAR
ONE WOMAN WON WOMAN : पुढील काही दशकांत लोकसंख्या, उद्योजिका (स्टार्ट अप) क्षेत्रात पुरुषांच्या तुलनेत देशातील महिला वाºयाच्या वेगाने पुढे येणार असल्याची माहिती समोर आली आहे. येत्या काळात महिलाच देशाच्या सर्वांगीण विकासात आघाडीवर राहणार असून, भविष्यातही त्यांचे कार्यकर्तृत्व अधिक उजळून निघणार असल्याचे यातून प्रतित होत आहे.
भारत सरकारच्या सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या वतीनेही ‘भारतातील महिला आणि पुरुष २०२३’ या शीर्षकाच्या २५ व्या अहवालाच्या पुस्तिकेत ही बाब स्पष्ट करण्यात आली आहे. समस्त महिलांसंदर्भात हा एक मोठा सकारात्मक बदल मानला जात आहे.
‘भारतातील महिला आणि पुरुष २०२३’ अहवालातून स्त्री-पुरुष समानतेच्या दिशेने केलेल्या प्रगतीवर प्रकाश टाकण्यात आला असून, विविध सामाजिक-आर्थिक निर्देशकांचे परीक्षण करण्यात आले आहे़ याद्वारे सरकार, संशोधक आणि सामान्य लोकांना माहितीपूर्ण निर्णय घेण्यास आणि स्त्री-पुरुष यांच्यासंबंधी संवेदनशील धोरणांच्या विकासामध्ये योगदानबाबत मदत होणार आहे. ‘पीआयबी’ ने या संदर्भातील वृत्त प्रकाशित केले आहे.
TAPORI TURAKI हे घे दहा रुपये आणि चल निघ…
महिला लोकसंख्येत वाढ
२०३६ पर्यंत भारताची लोकसंख्या १५२.२ कोटीपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे, ज्यात महिलांचे प्रमाण २०११ मधील ४८.५ टक्क्यांच्या तुलनेत किंचित सुधारून ४८.८ होण्याचा अंदाज आहे. जननदर कमी होत असल्याने १५ वर्षांखालील व्यक्तींचे प्रमाण २०३६ पर्यंत कमी होण्याची शक्यता आहे. याउलट, ६० वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या लोकसंख्येचे प्रमाण या काळात लक्षणीयरित्या वाढण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. याशिवाय २०११ मधील लोकसंख्येच्या तुलनेत २०३६ मधील भारतीय लोकसंख्येत महिलांचे प्रमाण अधिक असण्याची अपेक्षा असतानाच लिंग गुणोत्तरानुसार २०११ मध्ये ९४३ असलेले महिलांचे प्रमाण २०३६ पर्यंत ९५२ पर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. स्त्री-पुरुष समानतेच्या सकारात्मक कलाचे हे द्योतक असेल, असे स्पष्ट केले आहे.
मतदानाची टक्केवारी
सन १९९९ मधील १५ व्या सार्वत्रिक निवडणुकीपर्यंत महिला मतदारांचा सहभाग ६० टक्क्यांपेक्षा कमी होता. यात पुरुष मतदानाची टक्केवारी आठ टक्क्यांनी जास्त होती़ मात्र, २०१४ मधील निवडणुकीत महिलांचा सहभाग वाढून ६५.६ टक्क्यांवर पोहोचला आणि २०१९ मधील निवडणुकीत हाच आकडा ६७.२ टक्क्यांवर धडकला़ महिलांमधील वाढती साक्षरता आणि राजकीय जागरुकतेचा प्रभाव असल्याचे यातून दिसून येते़
TAPORI TURAKI अगं, दवाखान्यात जातेयं …
उद्योगांवरही वर्चस्व
उद्योग आणि अंतर्गत व्यापार संवर्धन विभागाने (डीपीआयआयटी) स्टार्ट अप्स योजनेला प्रारंभ केल्यापासून जानेवारी २०१६ ते डिसेंबर २०२३ या कालावधीत एकूण १,१७,२५४ स्टार्ट-अप्सना मान्यता दिली आहे. यापैकी ५५ हजार ८१६ स्टार्ट-अप्सचे नेतृत्व महिला करत असून, हे प्रमाण एकूण मान्यताप्राप्त स्टार्ट-अप्सच्या ४७.६ टक्के आहे. भारताच्या ‘स्टार्ट अप’ श्रेणीत महिला उद्योजकांचे योगदान आणि वाढता प्रभाव असल्याचे यातून दिसून येत असल्याचे ‘भारतातील महिला आणि पुरुष २०२३’ अहवालात प्रामुख्याने म्हटले आहे.