MAHAVIKAS AAGHADI l October 18, 2024
भारतीय निवडणूक आयोगाने आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात सुरू असलेल्या गैरप्रकारांची दखल घ्यावी, अशी मागणी महाविकास आघाडीच्या [ MAHAVIKAS AAGHADI ] नेत्यांनी केली आहे.
सोबतच मतदार याद्यांमधल्या अनियमिततेबद्दल श्वेतपत्रिका काढावी, असेही म्हटले आहे़
आघाडीच्या घटक पक्षांच्या नेत्यांनी आज मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांची भेट घेतली आणि त्यांना यासंदर्भात निवेदन दिलं. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी निवडणूक आयोगाला यासंदर्भात पत्र लिहिले आहे.
TAPORI TURAKI पण मी तुमची डाळ शिजू देणार नाही…
पराभवाची भीती वाटत असल्याने महाविकास आघाडीच्या समर्थकांची नावे मतदार याद्यांमधून वगळण्यासाठी अर्ज क्रमांक ७ आणि ८ मध्ये फेरफार करण्यात आले आहे़ महाविकास आघाडीने याबाबत भाजपावर जोरदार हल्ला चढविला आहे.