मुख्यमंत्री वयोश्री योजनेला ज्येष्ठ नागरिकांचा उत्फूर्त प्रतिसाद

Spread the love
file photo

VAYOSHRI YOJANA : ज्येष्ठ नागरिकांसाठी राज्य शासनाच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री वयोश्री योजनेला शहरातील ज्येष्ठ नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. नागपूर महानगरपालिकेच्या दहाही झोन निहाय असणाऱ्या ५१ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून आजवर ३ हजार ४७० नोंदणी अर्ज प्राप्त झाले आहेत. 

राज्यातील ६५ वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने/उपकरणे खरेदी करण्याकरीता तसेच मनःस्वास्थ्य केंद्र, योगोपचार केंद्र इ. द्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात मुख्यमंत्री वयोश्री योजना राबविण्यात येत आहे. 

मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांनी सांगितले की, मुख्यमंत्री वयोश्री योजनेच्या अंतर्गत  पात्र ज्येष्ठ लाभार्थ्यांना चष्मा, श्रवणयंत्र, ट्रायपॉड, स्टिक व्हील चेअर, फोल्डिंग वॉकर, कमोड खुर्ची, नि ब्रेस, लंबर बेल्ट, सर्वाइकल कॉलर इ. उपकरणे खरेदीकरिता थेट अर्थसहाय देण्यात येत आहेत.

आशा सेविका या मुख्यमंत्री वयोश्री या योजनेचा महत्वाचा भाग असून, ६५ वर्षावरील पात्र लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळावा याकरिता घरोघरी जाऊन योजनेचा फॉर्म लाभार्थी यांना देत आहेत. मनपाच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात नोंदणी अर्ज स्वीकारण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

प्राप्त अर्जानुसार युपीएचसीचे वैद्यकीय अधिकारी यांच्यामार्फत ज्येष्ठांची आरोग्य तपासणी केली जात आहे.  प्राप्त अर्ज हे समाज कल्याण विभागाला वर्ग केले जात आहेत. मनपाच्या दहाही झोन निहाय असणाऱ्या ५१ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून आजवर ३ हजार ४७० अर्ज प्राप्त झाले आहेत.

ज्येष्ठ नागरिकांनी आप-आपल्या जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जाऊन वैद्यकीय तपासणी करुन मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा लाभ घ्यावा, योजनेकरीता अर्ज प्राथमिक आरोग्य केंद्रात भरुन द्यावा, असे आवाहन डॉ. दीपक सेलोकर यांनी केले आहे.

झोन कार्यालय व आरोग्य वर्धिनी केंद्रातही अर्ज स्वीकारण्याची व्यवस्था

 मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार, मुख्यमंत्री वयोश्री योजनेचे नोंदणी अर्ज स्वीकारण्याची व्यवस्था आता ५१ नागरी प्राथमिकआरोग्य केंद्रासह  मनपाच्या दहाही झोन कार्यालय, आरोग्य वर्धिनी केंद्रावर करण्यात आली आहे. तसेच, दररोज या केंद्रांवर नोंदणी अर्ज स्वीकारले जाणार असल्याचेही डॉ. सेलोकर यांनी सांगितले.

lokbimb online team

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

वाचा खास जोक्स …TAPORI TURAKI घर आओ, बेलन लेकर इंतजार कर रही हू…

Sat Aug 24 , 2024
Spread the loveमीना : मेरे होंठ कितने खराब हैंडॉक्टर : … तो प्लास्टिक सर्जरी करा लोमीना : कितने पैसे लगेंगे?डॉक्टर : छह लाख रुपयेमीना : अगर प्लास्टिक मैं खुद लगा दूं तो?डॉक्टर : गोंद भी लेती आना, फ्री में चिपका दूंगा एक बार चम्पू ट्रेन में नागपूर से धामणगाव सफर […]

You May Like

Chief Editor

Johny Watshon

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua. Ut enim ad minim veniam, quis nostrud exercitation ullamco laboris nisi ut aliquip ex ea commodo consequat. Duis aute irure dolor in reprehenderit in voluptate velit esse cillum dolore eu fugiat nulla pariatur

Quick Links