RABBI HANGAAM 2024 : राज्यातील प्रमुख धरणे सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यातच ९० ते ९५ टक्क्यांपर्यंत भरली आहेत़ त्यामुळे यंदाच्या रब्बी हंगामातील पिकांना अधिक प्रमाणात पाणी उपलब्ध होवून जास्त उत्पादनाची अपेक्षा व्यक्त होत आहे.
मराठवाड्यात जायकवाडी धरण ९८ टक्के, सोलापुरात उजनी धरण १०० टक्के, सातारातील कोयना धरणात ९९ टक्के पाणीसाठा आहे. पुणे आणि कोकणातील ९७ टक्के धरणे पूर्ण भरली असून, मुंबई तसेच ठाणे जिल्ह्यातील धरणातली ९५ ते १०० टक्के पाणीसाठा असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे़
TAPORI TURAKI तीन लड़के पास हो जाते हैं…
नागपूर विभागातली धरणे ८५ टक्क्यांपर्यंत भरली असतानाच अमरावतीमधील ऊर्ध्व वर्धा धरण ९५ टक्के, तर यवतमाळमधील इसापूर धरण ९८ टक्के भरले आहे. मात्र, गोसीखुर्द धरण केवळ ५५ टक्के, उत्तर महाराष्ट्रातील जळगावमधील उर्ध्व तापी धरण ४५ टक्के भरले आहे. पुढील काही दिवसांत पावसाचा अंदाज पाहता आॅक्टोबरपर्यंत उर्वरित धरणे सुद्धा भरतील, असा अंदाज आहे. यामुळे शेतकºयांना रब्बी हंगामात जास्त उत्पादनाची अपेक्षा असल्याचे सांगण्यात येत आहे.
READ BELOW LINK :