मुंबई 27 FEBRUARY 2024 : राज्यातील व राज्याबाहेरील ज्या लेखकांनी मराठी भाषेत वाङ्मय निर्मिती केली आहे अशा लेखकांच्या उत्कृष्ट मराठी वाङ्मय निर्मितीस यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार देण्यात येतात. यावर्षी विविध प्रकारांमध्ये 35 लेखकांना शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित कार्यक्रमात या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. मराठी भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉ. लक्ष्मीकांत देशमुख, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष राजा दीक्षित आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती.