SUDHAKAR KOHALE l October 15, 2024
उण्यापुºया पाच वर्षांपासून रखडलेल्या राज्यपालनियुक्त महाराष्ट्र विधानपरिषद आमदारकीला अखेर आज मंगळवारी मुहूर्त मिळाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शिंदे गट, भारतीय जनता पार्टी आणि अजित पवार गटातील एकूण सात पक्ष सदस्यांनी विधानपरिषदेच्या सदस्यत्वाची शपथ घेतली़ यानंतर मात्र नागपुरातील माजी आमदार तसेच विद्यमान जिल्हा भाजपाध्यक्ष सुधाकर कोहळे [ EX MLA SUDHAKAR KOHALE ] यांची दावेदारी दक्षिण नागपूर मतदारसंघासाठी मजबूत मानली जात आहे़
काही महिन्यांआधी राज्यपालनियुक्त १२ आमदारांसाठी विद्यमान नागपूर जिल्हा भाजपाध्यक्ष तसेच माजी आमदार सुधाकर कोहळे यांच्या नावाचीही चर्चा सुरू झाली होती. तर, आपण कदापिही मागील दाराने महाराष्ट्र विधिमंडळात प्रवेश करणार नसल्याचे त्यांनी सुतोवाच केले होते़ आजच्या शपथविधी सोहळ्यामुळे दक्षिण नागपूर मतदारसंघासाठी [ SOUTH NAGPUR CONSITUENCY ] त्यांच्या उमेदवारीला बळ मिळाल्याचे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे़
CINERANG LOKBIMB : अभ्यासाची पुस्तके विकून अभिनय
२०१४ साली सुधाकर कोहळे यांनी नागपुरातील काँग्रेसचे दिग्गज नेते सतीश चतुर्वेदी यांना तब्बल ४३ हजार २१४ मतांनी पराभूत केले होते. भारतीय जनता पार्टीचे मोहन मते येथील विद्यमान विधानसभा सदस्य आहे़ त्यांनी मागील निवडणुकीत ४ हजार १३ मतांनी विजय मिळवला आहे.
सुधाकर कोहळे म्हणतात, मी मागील दाराने नाहीच…आपण लोकांतून निवडून येण्यास इच्छुक