देशातील एकूण राजकारणात महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा असतो़ कारण लोकसभा जागांचा वाटा हा दुसºया क्रमांकावर आहे; परंतु मंत्रिमंडळात मात्र निसटता हिस्सा असल्याचे सातत्याने दिसून येते़
CABINATE MINISTRY 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसºया टर्ममधील केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यातील सहा खासदारांनी आज (९ जून) मंत्रिपदाची शपथ घेतली़ यात नितीन गडकरी, पीयूष गोयल, मुरलीधर मोहोळ, रक्षा निखिल खडसे (सर्व भाजपा), रामदास आठवले (आरपीआय), प्रतापराव गणपतराव जाधव (शिवसेना शिंदे गट) यांचा समावेश आहे.
२०१४ मधील एकूण ७१ सदस्यांच्या मंत्रिमंडळात नितीन गडकरी [ NITIN GADKARI ] , सुनिल प्रभू, गोपीनाथ मुंडे (३ जून २०१४ रोजी अपघाती निधन), अनंत गिते, प्रकाश जावडेकर, सुभाष भामरे, हंसराज अहीर, रामदास आठवले यांचा समावेश होता. २०१९ मधील मंत्रिमंडळात नितीन गडकरी, नारायण राणे, रावसाहेब दानवे, भारती पाटील, रामदास आठवले, भागवत कराड, कपिल पाटील यांचा समावेश होता़ तर, यंदाच्या केंद्रीय मंत्रिमंडळात आज नितीन गडकरी (तिसºयांदा विजयी), पीयूष गोयल, प्रतापराव गणपतराव जाधव (चौथ्यांदा विजयी), रक्षा निखिल खडसे RAKSHA KHADASE (तिसºयांदा विजयी), रामदास आठवले, मुरलीधर मोहोळ (पहिल्यांदाच विजयी) यांना स्थान मिळाले आहे.
घसरती संख्या
देशातील एकूण राजकारणात महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा असतो़ कारण लोकसभा जागांचा वाटा हा दुसºया क्रमांकावर आहे; परंतु मंत्रिमंडळात मात्र निसटता हिस्सा असल्याचे सातत्याने दिसून येते़ मोदी सरकारच्या पहिल्या टर्ममध्ये राज्यातील मंत्र्यांची संख्या ८ होती़ २०१९ मधील मंत्रिमंडळात ही संख्या एकने कमी होऊन ७ वर आली़ तर, आज झालेल्या शपथविधीत ६ जणांचा समावेश आहे.