राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते चंद्रपुरातील परिचारिका आशा बावणेंचा सन्मान

Spread the love

AASHA WAMANRAO BAVANE : चंद्रपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील परिचारिका आशा बावणे यांना त्यांच्या २८ वर्षांच्या आरोग्यसेवेतील उल्लेखनिय योगदानाबद्दल बुधवारी सन्मानित करण्यात आले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी हस्ते त्यांना सन्मान प्रदान केला. एक लाख रुपये आणि प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

गडकरी आता ‘बदल’ करी, कोणता आणि कसा … वाचा

आशा बावणे यांनी विशेषत: आदिवासी आणि दुर्गम भागात आरोग्य सेवांमध्ये आपला ठसा उमटवला आहे. श्रीमती बावणे यांनी डायरियाच्या प्रकोपावर नियंत्रण, हज यात्रेत आरोग्य सेवा, तसेच, राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. कोविड-19 महामारीच्या काळात त्यांनी केलेल्या लस मोहिमेचे विशेष कौतुक झाले.
ही सेवा पाहता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्यांना राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्काराने गौरव करण्यात आला.

सोहळ्यात केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री अनुप्रिया पटेल, आरोग्य सचिव अपूर्व चंद्रा यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

TAPORI TURAKI झूठे, धोखेबाज, तुम तो कह रहे थे …

lokbimb online team

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

अजित पवार थेट ईव्हीएमच्या संगतीत, सुरू केली इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राची जनजागृती

Thu Sep 12 , 2024
Spread the loveAJIT PAWAR IN EVM : आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघात इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र (ईव्हीएम) आणि व्हीव्हीपॅटबाबत जनजागृती आणि प्रात्यक्षिक करण्यात येणार आहे. त्यासाठी तयार करण्यात आलेल्या जनजागृती फिरत्या रथाचा शुभारंभ खेड तहसील कार्यालयाच्या आवारात पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आला. […]

You May Like

Chief Editor

Johny Watshon

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua. Ut enim ad minim veniam, quis nostrud exercitation ullamco laboris nisi ut aliquip ex ea commodo consequat. Duis aute irure dolor in reprehenderit in voluptate velit esse cillum dolore eu fugiat nulla pariatur

Quick Links