ROAD RIGHTS : रस्ते अपघात जागृती राबविणारी सामाजिक मोहीम ‘रोड राईट्स’च्या वतीने मानेवाडा (रिंग रोड) चौकातील वाहनचालकांना ‘लाल झेंडी’चे वितरण करण्यात आले.
लहान मोठ्या वाहनचालकांना अनेकदा आपल्या वाहनातून लाकूड, काच, स्टाईल्स, कडप्पा, लोखंडी वा तत्सम साहित्य वाहून न्यावे लागते़ मात्र, त्याचा काही भाग वाहनाबाहेर आल्याने मागील वाहनांसोबत दुर्घटना होण्याची दाट शक्यता असते़ दुर्दैवाने याआधी काही दुर्घटनांना सामोरे जावे लागले आहे.
वाहनाच्या बाहेर आलेल्या भागावर ‘लाल झेंडी’ लावल्यास मागील वाहनचालकाला इशारा मिळल्याने सुरक्षित अंतर राखल्यास संभाव्य दुर्घटना टाळण्यास मदत होते.
महिलाविरोधी चेहरा पुन्हा उघड,भाजपा जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळेंनी लावली ‘या’ पक्षाला फटकार
TURAKI TAPORI मुलींनी टाळ्या वाजवल्या आणि म्हटले …
याच अनुषंगाने ‘रोड राईट्स’च्या वतीने मानेवाडा चौकातील काही वाहनचालकांना ‘लाल झेंडी’चे वितरण करण्यात आले़ अन्य वाहनचालकांनीही आपल्या वाहनाबाहेर कोणत्याही प्रकारच्या साहित्याचा भाग आल्यास त्याठिकाणी ‘लाल झेंडी’ बांधण्याचे आवाहन ‘रोड राईट्स’ने केले आहे. याप्रसंगी संजय मुंदलकर,
अतुल सागुळले तसेच वाहनचालक उपस्थित होते़
TAPORI TURAKI तुफानी बारिश में आधी रात को देवा पिझ्झा लेने गया…