अर्ज करण्याची मुदत दोन महिने
मुंबई : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील [ MUKHYAMANTRI LADAKI BAHIN ] अटींबाबत विरोधकांनी सरकारवर टीका सुरू केल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही नियम शिथिल केल्याची माहिती दिली़ वयाची मर्यादा वाढविण्यात आली असून, उत्पन्नाची अटही शिथिल केली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अंतरिम अर्थसंकल्पात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेची घोषणा केली. योजनेतंर्गत महिलांना शासनामार्फत दरमहा दीड हजार रुपये दिले जाणार आहेत. तसेच, यासाठी काही निकष लावण्यात आले आहेत. आता मात्र त्यात काही महत्त्वाचे बदल केले आहेत़ सदर योजनेत अर्ज करण्याची मुदत १ ते १५ जुलैपर्यंत ठेवण्यात आली होती. ती आता दोन महिने ठेवण्यात येत असून,३१ आॅगस्टपर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल. या मुदतीपर्यंत अर्ज करण्यात आलेल्या महिलांना१ जुलै २०२४ पासून दर महिला दीड हजारांचा आर्थिक लाभ देण्यात येणार आहे.
योजनेच्या पात्रतेमध्ये अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते. आता तसे प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्या ऐवजी १५ वर्षाआधीचे रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, जन्म दाखला. या चारपैकी कोणतेही ओळखपत्र/प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहेत.
सदर योजनेतून पाच एकर शेतीची अट वगळण्यात आली आहे. विशेष असे की सदर योजनेत महिलांचा वयोगट २१ ते ६०वर्षे ऐवजी २१ ते ६५ वर्षे वयोगट लागू करण्यात येत आहे.
दरम्यान, परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाºया पुरुषाबरोबर विवाह केला असल्यास त्यांच्या पतीचा जन्म दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, आधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे.