LADAKI BAHIN YOJANA l October 13, 2024
‘माझी लाडकी बहीण योजने’सह कोणत्याही कल्याणकारी योजना बंद होणार नाहीत, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे [ CM EKNATH SHINDE ] यांनी आज दिली.
नांदेडमध्ये आयोजित महिला सशक्तीकरण अभियान मेळाव्यात ते बोलत होते.
‘माझी लाडकी बहीण योजने’साठी सरकारने ३३ हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यातील १७ हजार कोटी रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात पोचले असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
विधानसभा निवडणूक आचारसंहितेमुळे दोन महिन्यांचे पैसे आगाऊ देण्यात आली आहे़ लाडक्या बहिणींनी साथ दिली तर या योजनेतून दिल्या जाणाºया रकमेत टप्प्याटप्प्याने वाढ होईल, अशी जोरदार ग्वाही मुख्यमंत्र्यांनी नांदेडात दिली.
कायमस्वरुपी ओवाळणी
वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देणारी अन्नपूर्णा योजना, मुलींना मोफत शिक्षण अशा योजनांचा उल्लेख करत या योजना म्हणजे महिलांना कायमस्वरुपी ओवाळणी आहे, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले़ राज्यातील युवकांना भत्त्यासह प्रशिक्षण देणारे महाराष्ट्र हे पहिलेच राज्य असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.