VIA NAGPUR : व्हीआयए एचआरडी फोरम, एनआयपीएम [ NIPM NAGPUR ] आणि आयएमटी नागपूर [ IMT NAGPUR ] यांच्या वतीने ‘संस्थात्मक सुधारणांसाठी सांस्कृतिक परीक्षण’ या विषयावर विशेष सत्र पार पडले़ हा कार्यक्रम 29 आॅगस्ट 2024 रोजी आयोजित करण्यात आला.
एनआयपीएम नागपूर चॅप्टरचे माजी अध्यक्ष प्रदीप अंधारे, व्हीआयए एचआरडी फोरमच्या निमंत्रक नीलम बोवडे, व्हीआयए एचआरडी फोरमचे सह अध्यक्ष डॉ. सुरेश पंदिलवार, पाहुणे वक्ते म्हणून टाटा कौशल्य प्रकल्प (टाटा स्किल्स प्रोजेक्ट), टाटा / टाटा ट्रस्ट्स बंगळुरू विद्यापीठाचे वरिष्ठ सल्लागार एच. एन. श्रीनिवास, एनआयपीएमचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अनंत टोळ आदींची उपस्थिती होती.
संस्कृती निर्माण करणे म्हणजे संस्थेमध्ये सकारात्मक ऊर्जा कशी निर्माण होते, ज्यामध्ये कर्मचारी, भागधारक, विक्रेते इत्यादींचा समावेश होतो. आपल्या ग्राहकांना आणि कर्मचाºयांना मूल्य प्रदान करणे आवश्यक आहे. संस्थेचे यंत्र भाग आणि मानवी भाग असे दोन भाग असतात. बहुतेक कंपन्या मशीनचा भाग सुधारण्यासाठी अधिक वेळ घालवतात; परंतु सामान्यत: मानवी भागाकडे दुर्लक्ष करतात. आपल्याला माहित आहे की, हा मानवी भाग संघटना तयार करतो आणि विस्तारही करतो़ ते तयार करण्यास किंवा तोडण्यास सक्षम असतात़ कोणत्याही संस्थेमध्ये विश्वास राखणे हा सर्वांत महत्त्वाचा घटक आहे. एखाद्या संस्थेला तिच्या लोकांकडून सकारात्मक ऊर्जा मिळत असेल, जर लोक कंपनीसाठी काम करण्यास उत्सुक असतील आणि त्यांना कंपनीशी जुळून असतील, त्याचे कारण केवळ कंपनीवर ठेवलेला विश्वासच असतो, असे एच. एन. श्रीनिवास यांनी स्पष्ट केले.
महिलाविरोधी चेहरा पुन्हा उघड,भाजपा जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळेंनी लावली ‘या’ पक्षाला फटकार
5-6 सांस्कृतिक स्तंभ
वरिष्ठ सल्लागार एच. एन. श्रीनिवास म्हणाले, की मजबूत संघटनात्मक संस्कृती निर्माण करण्यासाठी 5 ते 6 सांस्कृतिक स्तंभ [ CULTURAL PILLER ] आवश्यक आहेत. पहिला उद्देश उच्चस्तरावरील आहे. याचा अर्थ महत्त्वपूर्ण योगदान देण्याची इच्छा असणे, परिस्थिती बदलणे, उद्योगात सर्वोत्तम प्रतिभेसह काम करणे आणि अधिक जाणून घेण्याची इच्छा असणे. दुसरा मुद्दा कर्मचाºयाच्या संपूर्ण सहभागाचा आहे. याचा अर्थ कोणत्याही फॅन्सी घोषणा नाही. ही स्वप्ने पाहण्याची एक पद्धत आहे, सशक्तीकरणाची एक पद्धत आहे आणि कार्याचे प्रदर्शन आहे.
BADALAPUR CRUELTY बदलापूरमधील जनक्षोभानंतरच पोलिसांनी कारवाई केली, उच्च न्यायालयाचे ताशेरे
तिसरा मुद्दा ग्राहक संचालित गुणवत्ता आहे. उद्योगाने ग्राहकाचा आवाज ऐकण्यास शिकले पाहिजे़ कारण हाच ग्राहक एखाद्या उत्पादनाची किंवा सेवेची गुणवत्ता परिभाषित करत असतो. त्यांच्या गरजा योग्यरित्या पूर्ण करणे आणि या गरजा इच्छित उत्पादनात कसे रुपांतरित करायचे हे जाणून घेणे सुद्धा अतिशय महत्त्वाचे आहे, असे श्रीनिवास यांनी नमूद केले.
या जन्मात हसणं कुणालाच चुकले नाही …TAPORI TURAKI
प्रमुख वक्त्यांनी सांस्कृतिक स्तंभाच्या चौथ्या आणि पाचव्या भागाचाही ऊहापोह केला. चौथा मुद्दा म्हणजे मॅनेजमेंट बाय फॅक्ट्स. आजच्या काळात माहिती (डेटा) गोळा करणे खूप महत्त्वाची बाब ठरली आहे. यात ग्राहक आणि कर्मचारी यांचा समावेश करता येईल. यावर निर्णय घेत संस्था व्यवस्थापित करणे महत्त्वाचे ठरत असते़ कल्पनेद्वारे नव्हे तर तथ्यांद्वारे व्यवस्थापन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पाचवा मुद्दा हा सातत्याने काही तरी शिकण्याचा प्रवासाचा आहे़ (जर्नी बाय कंटिन्यूअस लर्निंग)़ जमीन पातळीवर काम करणाºया लोकांच्या सर्व सूचना, मते, कल्पना वा समर्थन एकत्रित करणे, त्या सूचना वा कल्पनांचे मूल्यमापन करणे आणि त्यांची अंमलबजावणी महत्त्वाची बाब म्हणता येईल़ यात सातत्याने सुधारणा केल्यास उद्योगाला नक्कीच यशाच्या उच्च पातळीपर्यंत पोहोचू शकता, असे ठोस प्रतिपादन वरिष्ठ सल्लागार एच. एन. श्रीनिवास यांनी केले. कार्यक्रमात त्यांनी अन्य बाबींवरही सखोल मार्गदर्शन केले.
तत्पूर्वी, एनआयपीएमचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अनंत टोळ यांनी वक्त्याचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. व्हीआयए आणि एनआयपीएम नागपूर चॅप्टर टीमतर्फे स्मृतिचिन्हही देण्यात आले. एनआयपीएम नागपूर चॅप्टरचे माजी अध्यक्ष प्रदीप अंधारे यांनी आपल्या स्वागतपर भाषणात सांगितले की, हा विषय प्रत्येक संस्थेच्या प्रगतीसाठी आणि सर्वोत्तम पद्धतींचा अवलंब करण्यासाठी अतिशय समर्पक आहे.
TURAKI TAPORI मुलींनी टाळ्या वाजवल्या आणि म्हटले …
प्रिन्सिपल कन्सल्टंट एचआर मनोज राजीमवाले यांनी उपस्थितांना अन्य महत्त्वाची माहिती प्रदान केली.
व्हीआयए एचआरडी फोरमच्या निमंत्रक नीलम बोवडे [ NEELAM BOVADE ] यांनी उद्घाटनपर भाषण केले आणि पाहुण्या वक्त्यांचा परिचय करून दिला. डॉ. स्मिता सिंग (दाभोलकर) लिखित ‘एक्सिलरेटेड आॅक्शन लर्निंग’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. व्हीआयए एचआरडी फोरमचे सहअध्यक्ष डॉ. सुरेश पंदिलवार यांनी आभार मानले. कार्यक्रमाला उद्योगपती, उद्योजक, एचआर व्यावसायिक/व्यवस्थापक, व्यवस्थापनाचे विद्यार्थी उपस्थित होते. एनआयपीएमचे शरद भावे, डॉ़ अनिता राव यांच्यासह अन्य मान्यवरांनी कार्यक्रमात हजेरी दर्शविली.