ANIL DESHMUKH ON ‘SHAKTI’ LAW : महिलांवर अत्याचार करणाºयांना फाशीची शिक्षा देण्याची तरतूद असलेला ‘शक्ती’ कायदा तातडीने मंजूर करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार तसेच माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे.
BADALAPUR CRUELTY बदलापूरमधील जनक्षोभानंतरच पोलिसांनी कारवाई केली, उच्च न्यायालयाचे ताशेरे
ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. महाविकास आघाडी सरकारच्या काळात विधिमंडळाने संमत केलेला हा कायदा तब्बल तीन वर्षांपासून केंद्र सरकारकडे मान्यतेसाठी पडून आहे. केंद्राने लवकरात लवकर मंजूर करून राज्यात लागू करावा, असे माजी मंत्री देशमुख यावेळी म्हणाले.