पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी मनापाद्वारे दरवर्षी शहरातील विविध गणेश मंडळांमध्ये जमा असलेले निर्माल्य विशेष निर्माल्य कलशामध्ये संकलित केले जाते. यावर्षी सार्वजनिक गणेश मंडळ येथे निर्माण होणारे निर्माल्य संकलीत करण्याकरीता प्रत्येक झोन करिता १ असे एकूण १० तसेच २ अतिरीक्त निर्माल्य रथ असे एकण १२ निर्माल्य रथ तयार करण्यात आले आहे.
नागपूर : यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक साजरा व्हावा याकरिता नागपूर महानगरपालिकेची संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली असून, गुरुवारी ( 5 SEPTEMBER ) मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या हस्ते मनपाच्या १२ निर्माल्य रथांचे लोकार्पण करण्यात आले.
निर्माल्य रथाव्दारे झोन निहाय सार्वजनिक गणेश मंडळाव्दारे स्थापन करण्यात आलेल्या श्री गणेशाचे निर्माल्य श्रद्धापूर्वक संकलित केले जाईल व शास्त्रोक्त पद्धतीने त्यावर प्रक्रिया करून त्यापासून खत निर्मिती केली जाणार आहे. श्रीं” च्या निर्माल्यापासून भांडेवाडी येथे खत निर्मिती करण्याकरिता व्यवस्था करण्यात आलेली आहे. घरगुती श्री गणेशाचे निर्माल्य नागरिकांनी त्यांच्या जवळच्या सार्वजनिक गणेश मंडळांकडे सुपूर्द करावे. मनपाचे स्वच्छता कर्मचारी ते निर्माल्य रथामध्ये संकलित करतील. यासाठी सर्व सार्वजनिक गणेश मंडळांनी आपल्या मंडपामध्ये निर्माल्य संकलन कलशाची व्यवस्था करण्याचे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.
TAPORI TURAKI तुफानी बारिश में आधी रात को देवा पिझ्झा लेने गया…
निर्माल्य रथांसाठी टोल फ्री क्रमांक नागपूर महानगरपालिकेद्वारे दहा झोनमध्ये १२ निर्माल्य रथांची व्यवस्था करण्यात आली आहे. या निर्माल्य रथांची व्यवस्था एजी एन्व्हायरो आणि बीव्हीजी या एजन्सींद्वारे करण्यात आली आहे. दोन्ही एजन्सीद्वारे या रथांच्या व्यवस्थेसाठी टोल फ्री क्रमांक देखील जारी केले आहेत.
गणपती बाप्पामुळे नागपुरातील खड्डे बुजविण्याला आलायं वेग …
लक्ष्मीनगर, धरमपेठ, हनुमान नगर, धंतोली आणि नेहरू नगर झोन साठी मध्ये एजी एन्व्हायरो एजन्सीद्वारे निर्माल्य रथांची व्यवस्था असून, यासाठी 18002677966 टोल फ्री क्रमांक, तर गांधीबाग, सतरंजीपुरा, लकडगंज, आशीनगर आणि मंगळवारी या झोनसाठी बीव्हीजी एजन्सीद्वारे 18002662101 टोल फ्री क्रमांक जारी करण्यात आले आहे.