SUDHAKAR KOHALE BJP October 2, 2024
आपण लोकांतून निवडून येण्यास इच्छुक असून, ‘मागील दारा’ने (विधानपरिषद) कदापिही महाराष्ट्र विधिमंडळात प्रवेश करणार नाही, असा निर्णय माजी आमदार तसेच विद्यमान जिल्हा भाजपाध्यक्ष सुधाकर कोहळे यांनी व्यक्त केला आहे़
नागपूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ [ SOUTH NAGPUR VIDHANSABHA CONSTITUENCY ] अतिशय महत्त्वाचा मानला जाते़ सध्या भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात असून, मोहन मते [ MLA MOHAN MATE BJP ] येथील विद्यमान आमदार आहे़ यंदाच्या निवडणुकीतील उमेदवारीसाठी मात्र जोरदार धुसफूस सुरू आहे. सुधाकर कोहळे यांनी या मतदारसंघावर दावा सांगितला असताना मते गोटात चिंतेची स्थिती आहे़
२०१४ साली काँग्रेस पक्षाकडून दिग्गज नेते सतीश चतुर्वेदी [ SATEESH CHATURVEDI CONGRESS ] यांना दक्षिणेत उतरविले. तर, भाजपाने सुधाकर कोहळे यांना संधी दिली़ त्यांनी सुद्धा तिचे ‘सोने’ करत त्यांनी तब्बल ४३ हजार २१४ मतांनी सतीश चतुर्वेदींना पराभूत केले होते. सत्यभामा लोखंडे, शेखर सावरबांधे, किरण पांडव, दीनानाथ पडोळे असे यातील उमेदवार होते.
TAPORI TURAKI तुम हर बात पर हमेशा मेरा-मेरा करती हो …
भारतीय जनता पार्टीने २०१९ मध्ये तत्कालीन आमदार सुधाकर कोहळे [ SUDHAKAR KOHALE BJP ] यांच्याऐवजी मोहन मते यांना उमेदवारी दिली. तर, काँग्रेस उमेदवार गिरीश पांडव यांनी मोहन मतेंना जोरदार टक्कर दिली. अत्यंत चुरशीच्या या लढतीत मतेंना फक्त ४ हजार १३ मतांनी विजय खेचून आणता आला.
यंदाची चुरस
२०१९ मध्ये असलेली राजकीय स्थिती ना नागपुरात आहे ना राज्यभरात आहे़प्रत्येक पक्ष ‘ताक सुद्धा फुंकून फुंकून पिण्या’च्या मनस्थितीत असल्याचे दिसून येते़ केंद्रीय नेतृत्वाचे लोकसभेतील ‘गणित’ स्थानिक निवडणुकीत कच्चे ठरत असल्याचे अनेकदा दिसून आले आहे़ त्यामुळेच सुधाकर कोहळे यांनी आपला दावा दमदारपणे ठोकत असल्याचे सूत्राचे म्हणणे आहे़
OXYGEN BIRD PARK नितीन गडकरींनी रस्तेनिर्मितीचा पर्यावरणासोबत घातला मेळ
दक्षिण नागपुरात रस्ते बांधकाम, ड्रेनेज आणि शिक्षणासंबंधी समस्या यासह गुन्हेगारीने त्रस्त केल्याची तीव्र भावना व्यक्त होत आहे. लोकप्रतिनिधी कोणत्याही प्रकारे दखल न घेत नसल्याचा संताप सर्वसामान्यांत व्यक्त होत आहे.