SCAM SE BACHO l October 18, 2024
आॅनलाईन गैरव्यवहारांच्या [ ONLINE FROUD ] वाढत्या धोक्याला नियंत्रणात ठेवण्यासाठी भारत सरकार आणि मेटा कंपनीने ‘स्कॅम से बचो’ असे अभियान सुरू केलं आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांच्या उपस्थितीत या अभियानाचा गुरुवारी नवी दिल्लीत प्रारंभ करण्यात आला.
माहिती आणि प्रसारण मंत्रालय, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, गृह मंत्रालय, भारतीय सायबर गुन्हे [ CYBER CRIMES ] समन्वय केंद्र्र यांनी मिळून या अभियानाचा आराखडा निश्चित केला आहे.
डिजिटल सुरक्षा आणि सतर्कता याबाबतच्या सरकारच्या दृष्टीकोनाचे प्रतिबिंब यात आहे. हा उपक्रम अगदी योग्य वेळी सुरू झाला असून, आॅनलाईन घोटाळ्याचा वाढता धोका पाहता नागरिकांच्या हितासाठी केलेली ही आवश्यक उपाययोजना आहे, अशी माहिती संजय जाजू यांनी दिली.
राज्यपालनियुक्त विधानपरिषद सदस्यांचा शपथविधी, विधानसभेसाठी संधी मात्र सुधाकर कोहळेंना …
डिजिटल इंडिया अभियानामुळे देशातीलइंटरनेट वापरकर्त्यांची संख्या 90 अब्जांवर गेली आहे. मात्र, त्याचवेळी सायबर गुन्ह्यांची संख्याही वाढत असल्याचेही त्यांनी नमूद केले