ATUL LONDHE ON AANANDACHA SHIDHA : महायुतीचा हा कसला आनंदाचा शिधा, हा तर त्यांच्यासाठी मलिदाच आहे, अशा शब्दांत काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी सरकारला थेट आरसाच दाखविला आहे.
अतुल लोंढे यांनी आज शुक्रवारी पत्रकार परिषदेत आनंदाच्या शिध्यातील साखर, डाळ, तेल निकृष्ट असल्याचे सिद्ध केले़
सणासुदीसाठी सरकारने जाहीर केलेला आनंदाचा शिधा किट अतिशय निकृष्ट दर्जाची असून, यात मोठा भ्रष्टाचार झाला आहे. एकूण १ कोटी ५६ लाख ३ हजार ३२८ शिधापत्रिकाधारकांना आनंदा शिधा उपलब्ध करून देण्याचे स्वप्न सरकारने दाखवले.
गडकरी आता ‘बदल’ करी, कोणता आणि कसा … वाचा
TAPORI TURAKI मैं घर संभालती हूं, किचन संभालती हूं …
क्रिस्टलसारखी साखर असावी, असे निविदेत नमूद असताना ही साखर पिवळसर आहे. सोयाबीनचे तेल १० ग्रॅम कमी असल्याने यातील मोठा भ्रष्टाचार झाल्याचे दिसून येते़अशा निकृष्ट साहित्य पुरवठ्यासाठी जबाबदार असलेल्या सर्व संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी अतुल लोंढे यांनी केली.