हुर्रे, नागपुरात महिला मतदारांची संख्या पुरुषांपेक्षा अधिक

Spread the love

LARGE NUMBER OF WOMEN VOTERS IN NAGPUR : नागपूर जिल्ह्यातील एकूण 12 विधानसभा मतदारसंघांची व ४ हजार ६१० मतदान केंद्रांची १ जुलै 2024 या अहर्ता दिनांकावर आधारित अंतिम मतदार यादी आज [ AUGUST 30,2024 ] प्रसिद्ध करण्यात आली. यातून नागपूर शहरातील सहा विधानसभा मतदारसंघांपैकी पाच मतदारसंघात महिला मतदारांची संख्या पुरुष मतदारांपेक्षा अधिक असल्याचे दिसून आले आहे. यात फक्त पूर्व नागपूरमध्ये पुरुष मतदारांची संख्या अधिक आहे.

file photo

रामटेक आणि नागपूर लोकसभा मतदारसंघातील १२ विधानसभा मतदारसंघात ४४ लाख ३५ हजार ५५३ मतदार आहेत. यात पुरुष मतदारांची संख्या 22 लाख 26 हजार 675 तर महिला मतदारांची संख्या 22 लाख 8 हजार 584 अशी आहे. तर इतर 294 मतदार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रवीण महिरे उपस्थित होते.

नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील एकूण मतदारांची संख्या ३ लाख ९९ हजार ९२१ आहे. यात पुरुष मतदार १ लाख ९७ हजार ४४१, तर महिला मतदार २ लाख २ हजार ४५१ तर इतर २९ मतदार आहेत.

नागपूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात एकूण मतदार ३ लाख ८८ हजार ११७ आहेत.
यात पुरुष मतदारांची संख्या १ लाख ९१ हजार २३८ तर
महिला मतदारांची संख्या १ लाख ९६ हजार ८७२ अशी आहे. ७ इतर मतदारांचा समावेश आहे.

नागपूर पूर्व विधानसभा मतदारसंघात ४ लाख ७ हजार ३१९ मतदार आहेत. यात पुरुष मतदारांची संख्या २ लाख ५ हजार ८४७ तर, महिला मतदारांची संख्या २ लाख १ हजार ४४२ तर इतर मतदारांची संख्या ३० अशी आहे.

नागपूर मध्य मतदारसंघात एकूण मतदारांची संख्या ३ लाख ३५ हजार ९५ आहे.
यात पुरुष मतदार १ लाख ६५ हजार ९७४ असून, महिला मतदारांची संख्या १ लाख ६९ हजार ८२ अशी आहे. ३९ इतर मतदारांचा समावेश आहे.

नागपूर पश्चिम विधानसभा मतदारसंघात एकूण मतदारांची संख्या ३ लाख ७९ हजार ४०१ अशी आहे.
यात पुरुष मतदार १ लाख ८८ हजार ४०३ तर, महिला मतदार १ लाख ९० हजार ९६८ तर इतर मतदार ३० आहेत.

नागपूर उत्तर विधानसभा मतदारसंघात एकूण मतदार ४ लाख २० हजार ६८१ आहेत.
यात पुरुष मतदार २ लाख ९ हजार ९०७ ची नोंद असून,
महिला मतदार २ लाख १० हजार ६७१ तर इतर मतदार १०३ इतक्या संख्येने आहेत.

 काटोल विधानसभा मतदारसंघात २ लाख ७८ हजार २४४ एकूण मतदार आहेत. यात पुरुष मतदार १ लाख ४१ हजार ४९७ तर महिला मतदार १ लाख ३६ हजार ७४१ तर इतर मतदार ६ आहेत.  सावनेर विधानसभा मतदार संघात ३ लाख १९  हजार ३१५ एकूण मतदार आहेत. यात पुरुष मतदार १ लाख ६० हजार ७६५, महिला मतदार १ लाख ५८ हजार ५४८ तर इतर २ मतदार आहेत.

हिंगणा विधानसभा मतदारसंघात एकूण मतदार ४ लाख ३६ हजार ९५५ आहेत. पुरुष मतदार २ लाख २६ हजार ९४ तर महिला मतदार २ लाख १० हजार ८३२ तर इतर मतदार २९ आहेत.

उमरेड विधानसभा मतदारसंघात २  लाख ९८ हजार १४४ एकूण मतदार आहेत. यात पुरुष मतदार १ लाख ५१ हजार ७५८ आहेत. तर महिला मतदार १ लाख ४६ हजार ३८६ आहेत. कामठी विधानसभा मतदारसंघात ४ लाख ८८ हजार ८२० मतदार आहेत. पुरुष मतदार २ लाख ४५ हजार ५२० तर महिला मतदार २ लाख ४३ हजार २८४ आहेत. इतर १६ मतदार आहेत.

रामटेक विधानसभा मतदारसंघात २ लाख ८३ हजार ५४१ एकूण मतदार आहेत. यात पुरुष मतदार १ लाख ४२ हजार २३१ तर महिला मतदार १ लाख ४१ हजार ३०७ तर इतर मतदार ३ आहेत.

जिल्ह्यात ४ हजार ६१० मतदान केंद्रे

जिल्ह्यात 12 विधानसभा मतदारसंघ मिळून एकूण मतदान केंद्राची संख्या 4610 अशी आहे. यात रामटेक लोकसभा मतदारसंघ अंतर्गत येणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघातील 2452 तर नागपूर लोकसभा मतदारसंघ अंतर्गत येणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघातील 2158 मतदान केंद्रांचा समावेश आहे.

lokbimb online team

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

TAPORI TURAKI तुफानी बारिश में आधी रात को देवा पिझ्झा लेने गया…

Sat Aug 31 , 2024
Spread the loveनीलिमा : उसने कपड़े धोये और उसे कपड़े धोने पडे.इन दोनों वाक्यों में अंतर बताओ?नामू : पहले वाक्य से व्यक्ती के अविवाहित होने का पता चलता हैऔर दुसरे वाक्य से उसके विवाहित होने का… बंटू : सर, मेरी वाईफ गुम गई हैपोस्टमन : यह पोस्ट आॅफिस है, पुलिस […]

You May Like

Chief Editor

Johny Watshon

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua. Ut enim ad minim veniam, quis nostrud exercitation ullamco laboris nisi ut aliquip ex ea commodo consequat. Duis aute irure dolor in reprehenderit in voluptate velit esse cillum dolore eu fugiat nulla pariatur

Quick Links