लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर पंकजा मुंडे यांचे राजकीय पुनर्वसन करण्यासाठी भारतीय जनता पार्टीने त्यांना विधानपरिषदेची उमेदवारी दिली. या निवडणुकीत पंकजा विजयी झाल्या. त्यांना संसदेऐवजी विधानपरिषदेत पोहोचण्यास यश आले, असेच म्हणावे लागेल़ शेवटी त्यांच्या समर्थकांचा वा पक्षाचा आनंद आणि समाधान महत्त्वाचे असले तरी पंकजा मुंडे यांना निवडून येणे भविष्यातील त्यांच्या राजकीय अस्तित्वासाठी ‘मस्ट’ [ MUST ] होते, असे राजकीय जाणकार म्हणतात.
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे [ PANKAJA MUNDE ] पराभूत झाल्याने त्यांच्या समर्थकांसह भारतीय जनता पार्टीलाही [ BHARTIY JANATA PARTY ] मोठा धक्का बसला होता़ कारण त्यांचा हा सलग दुसरा राजकीय पराभव होता. शेवटी त्यांना दहा वर्षांनंतर 2024 मध्ये विजय मिळाला असून, त्या विधानपरिषदेतून का होईना त्या विधिमंडळात पोहोचल्या आहे.
अर्थात त्यांच्या या विजयामुळे समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. शिवाय त्यांचे अप्रत्यक्ष का असेना ‘लोकप्रतिनिधी’ म्हणून राजकीय पुनर्वसन करण्यात भाजपालाही समाधान लाभले आहे. दुसरीकडे पंकजा मुंडे यांना विधानपरिषदेतून निवडून आणणे ही पक्षासाठी अगदी ‘काळाची गरज’ बनली होती़ त्या प्रत्यक्ष जनतेतून निवडून आणता आले नाही, ही आवश्यक बाब सुद्धा गौण ठरली होती, असे राजकीय समीक्षकांचे म्हणणे आहे.
पंकजा मुंडे 2014 मधील विधानसभा निवडणुकीत परळी मतदारसंघातून विजय मिळविला़ तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये त्यांना महिला आणि बालविकास मंत्रालय मिळाले होते़ या कार्यकाळात त्यांच्या भ्रष्टाचाराचे आरोपही झाले होते.
नंतरच्या दिवसांत 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत परळी विधानसभा मतदारसंघात भाऊ धनंजय मुंडे यांनीच त्यांना पराभूत केले होते. यंदा लोकसभा निवडणुकीपर्यंत राज्यातील राजकारणाच्या पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले़ धनंजय मुंडे राष्ट्रवादी काँगे्रसच, पण अजित पवार यांच्या गटात शिरले़ भाजपाने प्रीतम मुंडेंऐवजी पंकजा मुंडेंना लोकसभेची उमेदवारी दिली;परंतु
राष्ट्रवादी काँगे्रस शरद पवार पक्षाचे बजरंग सोनवणे यांनी 68 हजार 1569 मतांनी विजय मिळवला. पंकजा मुंडे यांनी 22 व्या फेरीपर्यंत तब्बल 38 हजार मतांची आघाडी घेतली होती़ मात्र, शेवटच्या काही निर्णायक फेºयांमध्ये सोनावणे यांनी मुसंडी मारली आणि अखेर रोमहर्षक तसेच उत्कंठावर्धक लढतीत बजरंग सोनावणे यांचा विजय झाला होता.
…तरीही होणार खासदार
पंकजा मुंडे लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्याने बीड जिल्ह्यात सर्वत्र नाराजी होती़ सानपवाडी गावाने तर एकमुखी ठराव करत पंकजा मुंडेंच्या पुनर्वसनाची मागणी केली. पंकजा यांचे पुनर्वसन केल्याशिवाय भाजपाला मतदान करणार नसल्याची भूमिका या गावकºयांनी घेतली होती. या पराभवानंतर मराठवाड्यासह राज्यातील ओबीसी समाज दुखावल्याचीही चर्चा समोर आली.
पंकजा मुंडेंचा लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव पंकजा मुंडेंच्या समथर्कांच्या जिव्हारी लागला. या पराभवानंतर काही जणांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल सुद्धा उचलले. लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात सध्या ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष पेटला आहे. मराठा आणि ओबीसी नेत्यांचे उपोषण पार पडले़ त्याचमुळे ओबीसी नेत्या पंकजा मुंडेंना राज्यसभेवर नियुक्त करावे, असा सूर राज्यातील काही नेत्यांनी सुरू केला होता. केंद्रीय नेतृत्त्वालाही तशी विनंती केल्याची माहिती समोर आली. त्यामुळेच पंकजा मुंडेंचे राजकीय पुनर्वसन करण्याच्या हालचाली भाजपाला सुरू कराव्या लागल्या. शेवटी विधानपरिषद निवडणूक धावून आली आणि 12 जुलै 2024 रोजीच्या निकालात 26 मते मिळविल्याने त्यांचा विजय झाला. आता पाच वर्षांनंतर त्या विधिमंडळात [ PANKAJA BACK TO VIDHAN BHAVAN ] दिसून येणार आहे.