INTERNATIONAL GIRL CHILD DAY l October 11, 2024
भारत सरकारच्या महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या नेतृत्वाखाली 2 ते 11 आॅक्टोबर या कालावधीत 10 दिवस आंतरराष्ट्रीय बालिका दिनाचा [ INTERNATIONAL GIRL CHILD DAY ] राष्ट्रीय उत्सव साजरा करण्यात आला. ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ याअंतर्गत सर्व राज्ये आणि केंद्र्रशासित प्रदेशांनी या 10 दिवसांत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले.
देशभरात, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांत समुदाय आणि भागधारक यांच्यासाठी मुलींच्या हक्कांबद्दल चर्चासत्रांचे आयोजन केले. विविध आव्हानांविषयी जागरूकता निर्माण केली. तसेच, मुलींचे शिक्षण आणि सक्षमीकरणाला पाठिंबा देणाºया उपक्रमांना प्रोत्साहन दिले. या उपक्रमांमध्ये वृक्षारोपण मोहीम, शालेय स्तरावरच्या गुणवंत मुलींचा सत्कार, ‘सेल्फी विथ डॉटर्स’ मोहीम, कन्या पूजन समारंभ, आरोग्य शिबिरे, परिसंवाद, चर्चासत्रे आणि क्रीडा स्पर्धा, मुलींचा सक्रिय सहभाग आणि सर्जनशीलता वाढवणाºया उपक्रमांचा समावेश होता.
TAPORI TURAKI हर समय चिड़चिड़ करती रहती है़
आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी [ MINISTER ANNAPURNA DEVI ] म्हणाल्या, की आपल्या मुलींना सक्षम करणे ही केवळ जबाबदारी नाही; तर त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हा आम्ही स्वीकारलेला दृष्टीकोन आहे. त्यांचे हक्क आणि क्षमता ओळखून प्रत्येक मुलीची प्रगती होईल, अशा न्याय्य समाजासाठी आपण मार्ग मोकळा करू शकतो.