नवी दिल्ली : कांदा, कापूस आणि सोयाबीन संदर्भात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार असल्याची माहिती राज्याच्या कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष तसेच पर्यावरण संतुलन टास्क फोर्स अध्यक्ष पाशा पटेल यांनी दिली.
केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्या निवासस्थानी बैठक झाली. बैठकीनंतर श्री. पटेल यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, कापूस, सोयाबीन आणि कांदा पिकांच्या विषयासंदर्भात केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि वाणिज्य मंत्री श्री. गोयल यांच्यासमवेत बैठकीचे आयोजन करण्यात आले.
TURAKI TAPORI मग…खाजवल्यावर वाजते का ?
बैठकीत कापूस – सोयाबीन – कांदा [ COTTON-SOYABEAN-ONOIN AGRO SITUATION ] या पिकांसंदर्भात वस्तुस्थिती केंद्रीय मंत्री श्री. गोयल यांच्यासमोर मांडली. शेतमालाचे आयात-निर्यात धोरण व अनुषंगिक बाबी याबाबत लवकरच ठोस निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. या बैठकीमध्ये विविध मुद्द्यांवर तपशीलवार चर्चा झाली असून, लवकरच शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, असे श्री. पटेल यांनी सांगितले.